
महाराष्ट्र पोलिस दलात समर्पित भावनेने काम करणाऱ्या पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलिस दल देशात अव्वल आहे, असे मत राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ल यांनी व्यक्त केले आहे.
.
हडपसर-रामटेकडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या आवारात झालेल्या २० व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्याचा समारोप प्रसंगी शुक्ला बोलत होत्या. यावेळी निवृत्त पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस महासंचालक सुनील रामानंद, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक राजेंद्र डहाळे, पिंपरी-चिंचवडचे सहपोलिस आयुक्त शशिकांत महानवर, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या शारदार राऊत, विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, वरिष्ठ पोलिस अधिकारी तेजस्विनी सातपुते, डॉ. बसवराज तेली, पल्लवी बर्गे, सौरभ अगरवाल, स्वप्ना गोरे आदी वरिष्ठ पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शुक्ला म्हणाल्या , पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या माध्यमातून पोलिसांचे तपास कौशल्य वाढीस लागते. महाराष्ट्र पोलिस दलाची प्रतिमा देशात अव्वल आहे. पोलिस दलातील प्रत्येक कर्मचााऱ्याच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र पोलिस दल अव्वल आहे. पोलिस दलातील कर्मचारी समर्पित भावनेने काम करतात. पोलिस दलाची प्रतिमा उंचविण्यासाठी यापुढील काळात प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे.
पोलिस निरीक्षक अर्चना कदम यांनी सूत्रसंचालन केले. डॉक्टर राजेंद्र डहाळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.