
Gopichand Padarkar VS Jayant Patil : गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांसंदर्भात बोलताना जीभ घसरली. दरम्यान यानंतर पवारांची राष्ट्रवादी देखील चांगलीच आक्रमक झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यभर आंदोलन करण्यात आली. तर संजय राऊतांनी देखील पडळकरांच्या वक्तव्यानंतर एक गौप्यस्फोट केला आहे. तेव्हा संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलंय पाहुयात.
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी एक मोठा दावा केलाय. जयंत पाटील भाजपात जाण्यास नकार देत असल्यामुळे पडळकरांनी त्यांचा बाप काढल्याचा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांनी केलेल्या या विधानानंतर भाजपनं देखील राऊतांवर पलटवार केला आहे.
जयंत पाटलांवर केलेल्या टीकेवर सत्ताधा-यांनी देखील खंत व्यक्त केलीये. मोठ्या नेत्यांवर बोलतांना सांभाळून बोलायला हवं असा सल्ला गुलाबराव पाटलांनी दिलाय. तर अमोल कोल्हे यांनी शायरीच्या माध्यमातून पडळकर आणि सरकारवर ताशेरे ओढले आहेत..
गोपीचंद पडळकरांवविरोधात राज्यभर पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येतंय. पडळकरांनी जयंत पाटलांचा बाप काढल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. इस्लामपुरात पडळकरांविरोधात केलेल्या आंदोलनात बापू बिरू वाटेगावकरांचा मुलगा शिवाजी वाटेगावकरांनी पडळकरांचा चांगलाच समाचार घेतलाय. गोपीचंद पडळकरांवर त्यांनी सडकून टीका केलीय.
पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील पडळकर यांचे कान टोचले आहेत. मात्र, याआधी देखील पडळकरांनी वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. तेव्हाही अशा प्रकारे त्यांना समज देण्यात आली होती. मात्र, तरीही त्यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या भाषेत टीका केल्यानं चांगलंच राजकारण तापलंय.
FAQ :
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर नेमके काय वक्तव्य केले?
भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी सांगली जिल्ह्यातील जत येथे कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात जयंत पाटलांनी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून म्हटले की, “जयंत पाटील हा राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काही तर गडबड आहे.” हे वक्तव्य अतिशय खालच्या पातळीचे आणि वादग्रस्त मानले गेले.
संजय राऊतांनी पडळकरांच्या वक्तव्यावर काय गौप्यस्फोट केला?
शिवसेना (UBT) खासदार संजय राऊतांनी म्हटले की, जयंत पाटील भाजपात जाण्यास नकार देत असल्यामुळे पडळकरांनी त्यांचा बाप काढला. त्यांनी हे वक्तव्य नारायण राणेंच्या मुलाने वडिलांचे नाव काढण्याच्या संदर्भात दिले आणि म्हटले की, “आम्ही कधी कोणाचा बाप काढला नाही, त्यांचे कर्तृत्व काढले नाही.”
पडळकरांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने काय केले?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने राज्यभरात पडळकरांविरुद्ध आंदोलने केली. सांगली, इस्लामपूर, मुंबईसह विविध ठिकाणी मोर्चे काढले गेले, ज्यात पडळकरांच्या फोटोला दुग्धाभिषेक किंवा पोस्टर्सना जोड्या मारल्या गेल्या. कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.