
Beed Gotya Gitte Mokka : वाल्मिक कराडचा राईट हँड असलेल्या गोट्या गित्तेवरील मकोका रद्द करण्यात आला आहे. सहदेव सातभाई हत्या प्रकरणातील 7 पैकी 5 आरोपींवरील मकोका रद्द तर दोन आरोपींवरील मकोका कायम ठेवण्यात आला. बीड पोलिसांनी रघु फड गॅंगवर मकोकांतर्गत कारवाई केली होती. या टोळीत सात जणांचा समावेश असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र, आता अपर पोलिस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील मकोका रद्द केला आहे… यात वाल्मीक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गितेचाही समावेश आहे.
या गँगमध्ये एकूण सात जणांचा समावेश होता. त्यात रघुनाथ फड, धनराज गीते, गोट्या गीते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गीते या सराईत आरोपींचा समावेश होता. प्रत्येकावर 10 ते 15 हून अधिक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. परळी परिसरात दहशत माजवणे, हत्यारांचा धडाधड वापर करणे, वादात थेट रक्तपात करणे ही या टोळीची ओळख बनली होती. गोट्या गीतेसोबत जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गीते या पाच जणांचा समावेश आहे.
दरम्यान पोलिसांचा हा निर्णय चुकीचा असून गोट्या गीतेवरील मकोका रद्द करू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीय. कायद्याच्या दृष्टिकोनातून बघता, मकोका हा फार कठोर कायदा मानला जातो. एकदा तो लागला की आरोपींना सहज जामीन मिळणं कठीण होतं. गोट्या गित्तेवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. अत्यंत गंभीर गुन्ह्यात गोट्या आरोपी आहे. असं असतानाही गोट्यावरील मकोका का काढला असा सवाल आता विचारला जात आहे.
दरम्यान, गोट्या गीते अजूनही फरार असल्यामुळे पोलिसांना मोठी डोकेदुखी ठरत आहे. रघु फड गँगचं जाळं कमकुवत करण्यासाठी त्याचा तातडीनं बंदोबस्त करणं गरजेचं असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. मात्र आता गोट्या गित्तेवरील मकोका रद्द केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय.
FAQ
1 गोट्या गीते हा कोण आहे?
गोट्या गीते हे वाल्मीक कराडचे निकटवर्तीय आणि राईट हँड म्हणून ओळखले जाणारे गुन्हेगार आहेत. ते रघुनाथ फड गँगचे प्रमुख सदस्य आहेत आणि बीड जिल्ह्यातील परळी परिसरात दहशत माजवण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
2 रघु फड गँग काय आहे?
रघु फड गँग ही बीडमधील एक सराईत गुन्हेगारी टोळी आहे, ज्यात रघुनाथ फड, धनराज गीते, गोट्या गीते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गीते हे सात सदस्य आहेत. ही टोळी हत्यारांचा वापर, हत्या प्रयत्न आणि वादात रक्तपातासाठी ओळखली जाते.
3 सहदेव सातभाई हत्या प्रकरण काय आहे?
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात सहदेव सातभाई यांच्यावर हल्ला करून हत्येचा प्रयत्न आणि लूट करण्यात आली होती. याप्रकरणी बीड पोलिसांनी रघु फड गँगच्या सात सदस्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.