
- Marathi News
- National
- SIR Is The Biggest Threat To Democracy: Congress, CWC Meeting In Bihar After 85 Years
पाटणा8 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
काँग्रेस पक्षाने मतदार याद्यांच्या विशेष सखाेल पुनरिक्षण (एसआयआर) हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. पक्षाने याला भाजपचे षड््यंत्र संबाेधले आणि म्हटले आहे की भाजप मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सत्तेत राहू इच्छित आहे. बुधवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत मंजूर झालेल्या दोन ठरावांमध्ये हे भाष्य करण्यात आले.
पाटणा येथील सदाकत आश्रमात झालेल्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. स्वातंत्र्यानंतर बिहारमधील ही पहिलीच सीडब्ल्यूसीची बैठक आहे. ८५ वर्षांपूर्वी १९४० मध्ये अविभाजित बिहारमधील रामगड येथे सीडब्ल्यूसीची बैठक झाली हाेती. या ठरावात म्हटले आहे की, “मत चोरी आणि मतदार याद्यांमधील अनियमितता यामुळे लोकशाहीच्या पायावरचा जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे.” मत चोरी आणि लोकशाही कमकुवत करण्याच्या प्रयत्नांविरुद्धच्या धाडसी लढ्याबद्दल सीडब्ल्यूसीने राहुल गांधींचे कौतुक केले. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधी पुढील महिन्यात मत चोरीवर अनेक खुलासे करतील. हे खुलासे हायड्रोजन बॉम्ब, मिनी हायड्रोजन बॉम्ब आणि प्लुटोनियम बॉम्बसारखे असतील. माजी अध्यक्ष राहुल गांधी, कोषाध्यक्ष अजय माकन, सरचिटणीस केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, सचिन पायलट आणि बिहार काँग्रेसचे प्रमुख राजेश कुमार यांच्यासह इतरांनी बैठकीला उपस्थिती लावली.
लक्ष्य… परराष्ट्र धोरण मैत्रीवर चालत नाही… राष्ट्रीय हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या : राहुल
अमेरिकेने भारतावर लादलेले मोठे कर आणि एच-१बी व्हिसाच्या कठोर नियमांंदरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. बैठकीत राहुल म्हणाले की परराष्ट्र धोरण वैयक्तिक मैत्रीवर चालत नाही. मोदी सरकारने भारताचे परराष्ट्र धोरण उद्ध्वस्त केले आहे. पंतप्रधान ट्रम्प यांच्याविरुद्ध उभे राहा आणि राष्ट्रीय हिताला सर्वोच्च स्थान द्या. ‘अति मागास न्याय संकल्प ’ या चर्चासत्रात राहुल म्हणाले की नितीश कुमार सरकारने २० वर्षांत अत्यंत मागासलेल्या लोकांसाठी काहीही केले नाही. त्यांचा वापर फक्त मतपेढी म्हणून केला गेला.
आरोप… माेदींच्या ‘उद्धटपणा’चा उलटा परिणाम, देश एकाकी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “उद्धटपणा” अपयशी ठरला आहे, असा दावा करत काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला. परिणामी, देश राजनैतिकदृष्ट्या एकाकी पडला आहे व राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यास असमर्थ झाला. राजकीय ठरावात म्हटले आहे की स्वातंत्र्यापासून कायम असलेली भारताची धोरणात्मक स्वायत्तता सध्याच्या सरकारने अमेरिका आणि चीनमधील डळमळीतपणामुळे नष्ट केली आहे.
बिहारमध्ये काँग्रेस इंडिया आघाडीचा केंद्रबिंदू
बिहारमध्ये काँग्रेस पक्ष राजदचा कनिष्ठ भागीदार आहे. परंतु, प्रथम मतदार हक्क यात्रेत तेजस्वी यांना सोबत घेऊन आणि आता अत्यंत मागासलेल्या न्यायाच्या ठरावाच्या अजेंड्यावर सहमत करून, राहुल यांनी हा संदेश दिला आहे की आता राजद म्हणेल ती पूर्वदिशा नसेल. आघाडीचा केंद्रबिंदू म्हणून काँग्रेस समान भागीदार राहील. जेडीयूची मतपेढी असलेल्या अतिमागास प्रवर्गीयांवरील आक्रमक रणनीती दर्शवते की काँग्रेस आपली मतपेढी वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. घटक पक्षांना असाही संदेश मिळाला की त्यांच्या जागांची मागणी आरजेडी केवळ पूर्ण करणार नाही. काँग्रेसची संमती देखील आवश्यक असेल.
भाजपने म्हटले- काँग्रेसचा ड्रायव्हिंग सीट बळकावण्याचा प्रयत्न… भाजप खासदार रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेसने ८५ वर्षांनंतर केवळ राजकीय फायद्यासाठी पाटण्यात सीडब्ल्यूसीची बैठक आयोजित केली आहे, जेणेकरून राजदकडून अधिक जागा मागता येतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.