
Navi Mumbai Airport Inauguration : देशातील पहिले ग्रीन फिल्ड आतंरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला पर्याय म्हणून हे विमानतळ उभारले जात आहे. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची फायनल तारीख अखेर जाहीर जाली आहे. नावाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-3 या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील. नवी मुंबईला दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येईल, तसा प्रस्ताव आम्ही पाठविला आहे, अशीही माहितीही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
विशेष म्हणजे एअर इंडिया समुहाने नवी मुंबई विमानतळावरुन एअर इंडिया एक्सप्रेसची 20 उड्डाणे होणार असल्याचे नुकतीच जाहीर केले आहे. देशातील 15 शहरांना या विमानतसेवेद्वारे जोडले जाणार आहे. भविष्यात एअर इंडिया समूहाचा या विमानतळावरुन 55 ते 60 उड्डाणे करण्याचा मानस आहे. नवी मुंबईतून विमानोड्डाणाच्या मुहूर्ताची गत 9 महिन्यांपासून तारीख पे तारीख पडत होती. नवी मुंबई विमानतळ टर्मिनल- 1 चे काम वॉर फुटींगवर सुरू असून तब्बल 13 हजार कामगार विमानतळ प्रकल्पस्थळी काम करत आहेत. त्यामुळे फक्त देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान सेवा सुरु करण्यासह परदेशांतर्गत (इंटरनॅशनल) विमानसेवा देखील एकाच वेळेस सुरू करण्याचा मानस अदानी सुमूह व केंद्र सरकारच्या स्तरावर घेतला गेल्याचे बोलले जाते
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प हा नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. सदर विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी निर्माण होणार आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील पहिले ग्रीनफील्ड विमानतळ म्हणून नावारुपास येणार आहे. यासाठी 37 मेगा वॅट ग्रीन एनर्जीचा वापर केला जाणार आहे. तसेच चारी बाजूने या विमानतळाला कनेक्टिव्हीटी प्राफ्त असून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळापेक्षा या विमानतळाची जास्त क्षमता आहे. विमानतळाच्या २ रनवेचे काम पूर्ण झाल्यानंतर वर्षाकाठी 2 कोटी प्रवासी येथून ये-जा करु शकणार आहेत.
दरम्यान, येत्या ८ ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथून पहिल्या विमानोड्डाणाची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सदर विमानतळ परिसर सीआयएसएफ च्या ताब्यात दिला जाणार आहे. त्यानंतर तब्बल ४५ दिवस विमानतळ आणि परिसराचे स्कॅनिंग करून सदर परिसर सीआयएसएफद्वारा सुरक्षित केला जाणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवी मुंबईतून कमर्शियल फ्लाईटसच्या उड्डाणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
FAQ
1. नवी मुंबई विमानतळाबाबत मुख्य माहिती काय?
नवी मुंबई विमानतळ हा देशातील पहिला ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, जो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला पर्याय म्हणून उभारला जात आहे. हा विमानतळ नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी वाहतूक आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी आणि व्यापार वाढीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.
२. विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख आणि कार्यक्रम काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी फिनटेक परिषदेसाठी मुंबईत येणार असून, नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-३ या प्रकल्पांचा शुभारंभ ते करतील. ८ ऑक्टोबर रोजी पहिल्या विमानोद्दाणाची औपचारिकता पूर्ण होईल, त्यानंतर विमानतळ परिसर सीआयएसएफच्या ताब्यात दिला जाईल.
३. विमानतळाचे नाव काय असेल?
नवी मुंबई विमानतळाला दिवा बापू पाटील (दि. बा. पाटील) यांचे नाव देण्यात येईल, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.