
आई ही मायेचा झरा असतो. ती आपल्या लेकरांसाठी काहीही करायला तयार असते. पण नुकताच एका बातमीने हृदयाचे ठोके चुकले आहेत. महाराष्ट्रातील पालघरमधील या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. पालघरमधील धनसर गावात एका आईने रागाच्या भरात आपल्या 7 वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. कारणही फक्त एवढंच होतं की, त्या मुलाने जेवण्यात चिकनची मागणी केली म्हणून संतापलेल्या आईने मुलाला लाथ मारलाय सुरुवात केली.
आईच्या मारहाणीमुळे 7 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच उघड होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
ही घटना पालघर इथल्या घोरिला कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. रागाच्या भरात, आरोपी महिलेने तिच्या मुलाला लाथ मारण्यास सुरुवात केली. मुलाच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे तो गंभीर अवस्थेत झाली. धक्कादायक म्हणजे, गंभीर दुखापती असूनही, आईने त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले नाही. अशा परिस्थितीत रात्री उशिरा उपचाराशिवाय त्या मुलाचा घरीच मृत्यू झाला.
स्थानिक रहिवाशांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी महिलेला तात्काळ अटक केली. घटनेत वापरलेला रोलिंग पिन देखील पुरावा म्हणून जप्त करण्यात आला आहे.
पोलीस तपासात असे दिसून आले आहे की, आरोपी महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती. ती तिच्या दोन मुलांसह आणि दोन बहिणींसह घोरिला कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. मृत मुलाची 10 वर्षांची बहीण अत्यंत घाबरलेली आहे. पोलिसांनी मुलीला सुरक्षिततेसाठी अनाथाश्रमात पाठवले आहे.
सध्या आरोपी आईने तिच्या मुलाच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारली आहे. पण, स्थानिक रहिवाशांचा असा विश्वास आहे की या घटनेमागे इतर कारणे असू शकतात. या प्रकरणातील सत्यता शवविच्छेदन अहवाल आणि सविस्तर पोलीस तपासानंतरच समोर येईल.
FAQ
1. पालघर हत्याकांड नेमके काय आहे?
पालघर जिल्ह्यातील धनसर गावातील घोरिला कॉम्प्लेक्समध्ये एका आईने रागाच्या भरात आपल्या ७ वर्षीय मुलाची मारहाणीत हत्या केली. मुलाने जेवणात चिकनची मागणी केल्याने संतापलेल्या आईने लाथा मारले, ज्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.
2. घटना कधी आणि कुठे घडली?
घटना नुकत्याच घडली असून, ठिकाण पालघर जिल्ह्यातील धनसर गावातील घोरिला कॉम्प्लेक्स आहे. मुलाचा मृत्यू रात्री उशिरा घरी झाला.
3. मुलाचा मृत्यू कसा झाला?
मुलाने जेवणात चिकनची मागणी केल्याने आईने रागात लाथा मारले. मुलाच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाल्या. आईने उपचार न देता घरी ठेवले, आणि रात्री उशिरा मुलाचा मृत्यू झाला.
4. आईने मुलाला रुग्णालयात का नेले नाही?
आईने गंभीर दुखापती असूनही मुलाला रुग्णालयात नेले नाही. स्थानिक रहिवाशांना संशय आल्याने पोलिसांना माहिती दिली गेली, आणि तेव्हा घटना उघडकीस आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



