
Lizard found in Vada Pav : वडापाव हा सर्वांनाच आवडणार पदार्थ असून कुठेही गेलं तर वडापाव खाण्याची मजाच काही औरच असते. स्वस्त आणि मस्त शिवाय पोटभर आणि कुठेही सहज उपलब्ध तर असतोच तसंच खाण्यास सोईसकर असा हा पदार्थ महाराष्ट्राची शान आहे. राज्याच्या कुठल्याही कोपऱ्यात जा वडापावचे अनेक हॉटेल आणि स्टॉल दिसतात. राज्यात खास वडापावचे प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पण वडापाव बाबत एक धक्कादायक आणि किळसवाणी बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर इथल्या प्रसिद्ध हॉटेलमधील प्रकार कळल्यास तुमच्याहीव पायाखालची जमीन सरकेल.
खालापूर तालुक्यातील मुंबई- पुणे जुन्या हाय-वेवर चौक गावातील उजाला हॉटेलमधील भयानक घटना समोर आली आहे. हे या गावातलं वडापावसाठी प्रसिद्ध हॉटेल असल्याने इथे कायम ग्राहकांची गर्दी पाहिला मिळते. पण इथं आलेल्या एका ग्राहकावर जीवघेणा प्रसंग ओढवला. या ग्राहकाने वडापाव खाण्यासाठी विकत घेतला खरा पण त्या वडापावामध्ये त्याला पाल आढळली. त्यानंतत संतप्त झालेल्या ग्राहकांना हॉटेल मालकाला याचा जाब विचारला हॉटेलमध्ये वाद झाला.
त्या ग्राहकाचे नाव भरत वाघ असून चौक मधील उजाला हॉटेलमध्ये सोमवारी त्यांच्यासोबत हा धक्कादायक घटना घडली. त्यांनी हॉटेलमध्ये वडापाव खायला घेतला पण त्यांच्या तोंडात काहीतरी विचित्र जाणवलं. त्यामुळे त्यांनी वडा कुस्करून पाहिला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वडापावमध्ये त्यांना मृतावस्थेत पाल सापडली. या घटनेनंतर येथील ग्रामस्थानी हॉटेल मालकाला जाब विचारला असता हॉटेल मालकाने उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे वातावरण गंभीर झाले. ग्रामस्थांनी त्या हॉटेल मालकाला धारेवर धरले त्यामुळे एकच वाद झाला.
दरम्यान, ही घटना चौक गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर जागरूक ग्रामस्थांनी हॉटेलमालकाला हॉटेल बंद केलं. या अगोदर देखील चौक येथील हॉटेल मधील खाद्य पदार्थात झुरळ, किडे, पाली आढळल्या होत्या. पण अन्न आणि औषध प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. चौक येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी प्रशासनानेकडे आता या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचे सांगितलं आहे. वडापावमध्ये पाल आढळणे म्हणजे ग्राहकांच्या जीवाशी खेळण्या सारखेच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
FAQ
1: ही घटना कुठे घडली?
उत्तर: ही घटना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील चौक गावात, मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर असलेल्या उजाला हॉटेलमध्ये घडली. हे हॉटेल वडापावसाठी प्रसिद्ध आहे आणि नेहमी ग्राहकांची गर्दी असते.
2: घटनेचा मुख्य मुद्दा काय आहे?
उत्तर: एका ग्राहकाला वडापावमध्ये मृतावस्थेत पाल सापडली. हे खाण्याच्या वेळी घडले, ज्यामुळे ग्राहकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि हॉटेलमध्ये वाद झाला.
3: ग्राहकाचे नाव आणि घटना कधी घडली?
उत्तर: ग्राहकाचे नाव भरत वाघ आहे. ही घटना सोमवारी घडली. त्यांनी वडापाव खाताना तोंडात विचित्र वाटले, कुस्करून पाहिले तेव्हा वड्यात मृत पाल दिसली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.