
दसरा वाईटावर विजयचा हा सण म्हणून साजरा करण्यात येतो. दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी देशभरात रावणाचा पुतळ्याच दहन करण्यात येतं. हिंदू धर्मात रावण हा दृष्ट आणि वाईट राजा मानला गेला आहे. पण महाराष्ट्रातील दोन असे मंदिर आहेत, जे रावणाच्या नावानं ओळखली जातात. पुराणात आणि रामायणात असा उल्लेख आहे की, रावण हा महादेव शंकराचा मोठा भक्त होता. लंकाधिपती रावणाने शंकराची उपासना केलेले शिव मंदिरदेखील आहे. अगदी पुरातन हे मंदिर रावणेश्वराच्या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रात अशी दोन मंदिरं आहेत. कुठे आहेत ही मंदिरं आणि काय आहे त्यांचा इतिहास जाणून घेऊयात.
‘या’ 2 शिवमंदिराला रावणाच्या नावानं जातं ओळखलं!
पहिलं मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील देवगाव-रंगारी मार्गावर ‘शिवूर’ गावात, जे रावणेश्वर महादेवाचे मंदिर नावाने ओळखलं जातं. हे मंदिर शहरापासून अवघ्या 57 किलोमीटरवर हे गाव आहे.
काय आहे या मंदिराची आख्यायिका?
रामायण काळात शिवूर हे जंगलाने वेढलेली जागा असून इथे रावणाने शिव वरदानासाठी कठोर तपस्या केली होती असं सांगितलं जातं. मात्र, महादेव रावणावर प्रसन्न झाले नाहीत. तेव्हा रावणाने आपली नऊ मुंडकी अर्पण केली आणि दहावं मुंडके कापण्याच्या तयारीत असतानाच शंकर प्रकट झाले. त्यावेळी रावणाने भगवान शंकराला विनंती केली की, “तुमचं हे रूप माझ्या नावानं ओळखलं जावं.” भगवान शंकरांनी तथास्तू म्हटलं. त्यावेळी या जागेवर शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तब्बल 88 हजार ऋषी बोलावले गेलं. मात्र, कोणीही मंत्र म्हणण्यास तयार नव्हते. अखेर खुद्द ब्रह्मदेवांनी मंत्रोच्चार केलं आणि येथे शिवपिंडीची प्राणप्रतिष्ठा झाली. आजही ही शिवपिंड ‘रावणेश्वर’ म्हणून पूजण्यात येतं.
दुसरं मंदिर आहे कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम शेजारी आणि छत्रपती शाहू स्टेडियमला लागूनच हे रावणेश्वर मंदिर. कोल्हापुरातील पूर्वीच्या पद्मालयाच्या काठावर मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांचे देखील या क्षेत्री आगमन झाले होते. आपल्या पदस्पर्शानी पावन केलेले हे पवित्र क्षेत्र म्हणजे श्री रावणेश्वर मंदिर. करवीर महात्म्य या पवित्र ग्रंथात असा उल्लेख येतो कि, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण सीतामाता वनवासात असताना करवीर क्षेत्री आल्या समयी त्यांना दशरथ राजाला पिंडदान करण्याची वेळ आली. त्यावेळी अन्य काही साधन न मिळाल्याने सीता मातेने वाळूचे पिंड तयार करून ते जवळच वाहणाऱ्या जयंती नदीत प्रवाहित केले. माता सीतेचा श्रद्धाभाव आणि करवीर क्षेत्राच्या अगाध प्रभावामुळे दशरथ राजा तृप्त होऊन मोक्षास गेला.
वास्तविक पाहता पिंडदानाचा अधिकार पुत्राचा आणि शास्त्र विधानाप्रमाणे तो पिंड हा सातूच्या पिठाचा किंवा भाताचा हवा. मात्र एका स्त्रीच्या हातून वाळूच्या पिंडदानाने सासऱ्याला मोक्ष मिळणे, ही गोष्ट करवीर महात्म्यात स्पष्ट करणारी आहे. त्यामुळेच करवीर क्षेत्राचे हे महात्म्य जाणून प्रभू रामचंद्रांनी इथल्या एका तीर्थाच्या काठावर स्वतःच्या नावे आणि लक्ष्मणाने आपल्या नावे अशी दोन लिंगे स्थापन केली. सध्या रावणेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जे लिंग आहे ते रामेश्वर लिंग तर मंदिराच्या आवारात जे बाहेर लिंग आहे ते लक्ष्मणेश्वर लिंग होय. तसेच पूर्वी इथे असणाऱ्या तीर्थाला सीता तीर्थ म्हणून ओळखले जात असे.
FAQ
1: दसरा सण कशासाठी साजरा केला जातो आणि रावणाशी त्याचा संबंध काय?
उत्तर: दसरा हा वाईटावर विजयाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी श्रीरामाने रावणाचा वध केला होता, त्यामुळे देशभरात रावणाचा पुतळा दहन केला जातो. हिंदू धर्मात रावण हा दृष्ट आणि वाईट राजा मानला जातो, पण पुराण आणि रामायणात तो महादेव शंकराचा मोठा भक्त होता असे उल्लेख आहेत.
2: महाराष्ट्रात रावणाच्या नावाने ओळखली जाणारी मंदिरे कोणती आहेत?
उत्तर: महाराष्ट्रात दोन शिवमंदिरे रावणाच्या नावाने ओळखली जातात: पहिले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिवूर गावातील ‘रावणेश्वर महादेव मंदिर’ आणि दुसरे कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम शेजारील ‘रावणेश्वर मंदिर’. ही मंदिरे रावणाच्या शिवभक्तीशी संबंधित आहेत.
3: शिवूर येथील रावणेश्वर मंदिर कुठे आहे आणि त्याची आख्यायिका काय?
उत्तर: हे मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या ५७ किलोमीटरवर, देवगाव-रंगारी मार्गावर शिवूर गावात आहे. रामायण काळात हे जंगल होते. रावणाने येथे शिवासाठी कठोर तपस्या केली. नऊ मुंडके अर्पण केल्यानंतर दहाव्या मुंडक्याच्या तयारीत शंकर प्रकट झाले. रावणाने विनंती केली की हे रूप माझ्या नावाने ओळखले जावे, शंकरांनी मान्य केले. ८८ हजार ऋषी बोलावले गेले, पण ब्रह्मदेवांनी प्राणप्रतिष्ठा केली. आजही ही शिवपिंडी ‘रावणेश्वर’ म्हणून पूजली जाते. संत बहिणाबाईंच्या अभंगातही याचा उल्लेख आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.