
Pune Police Notice to Gautami Patil: आपल्या लावणींसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असणाऱ्या नृत्यांगना गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील सिंहगड पोलिसांनी गौतमी पाटीलला चौकशीची नोटीस बजावली आहे. मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात झालेल्या अपघात प्रकरणी पोलिसांनी ही नोटीस पाठवली आहे. हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर झालेल्या अपघातात गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला जोरदार धडक दिली होती. ज्यामध्ये 44 वर्षीय रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला होता.
नेमकं घडलं काय?
गौतमी पाटीलच्या मालकीची एमएच 12 डब्ल्यू झेड 6589 या क्रमांकाच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत धायरीमधील गारमळा येथील उझ्वल दीप सोसायटीत राहणारा 44 वर्षीय रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला .
रिक्षाचालक प्रवासी घेण्यासाठी वडगाव बुद्रुक येथील हॉटेल विश्वाससमोरील सर्व्हिस रोडवर थांबले असताना, भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांच्या रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी रिक्षाचालक सामाजी मरगळे यांचे मित्र युवराज ज्ञानोबा साळवे (वय 32) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची गौतमी पाटीलला नोटीस
या गुन्ह्यात पोलीस मूळ आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जखमी रिक्षाचालकाच्या कुटुंबियांनी घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. शिवसैनिकही त्यांच्यासोबत आंदोलन करत आहेत. अपघात प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावूनही गौतमी पाटील हजर का होत नाही? असा सवाल पीडित कुटुंबाचा आहे. दरम्यान सिंहगड पोलिसांनी या अपघात प्रकरणात ज्या चालकावर कारवाई केली आहे तो मूळ आरोपीच नाही असा आंदोलनकर्त्यांचा दावा आहे.
दोषींवर कठोर कारवाई करा, चंद्रकांतदादा पाटील यांचे डीसीपी संभाजी पाटील यांना निर्देश
नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
मरगळे कुटुंबियांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर ना. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.
कारचालक पळून गेला
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गौतमी पाटील यांच्या मालकीच्या कारची रिक्षाला मागून एवढ्या जोरदार धडक बसली की रिक्षाचे मोठे नुकसान झाले. रिक्षाचालक मरगळे गंभीररित्या जखमी झाला. तसेच अपघात झाला तेव्हा या रिक्षामध्ये दोन प्रवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली होती. धडक दिल्यानंतर कार चालक घटनास्थळी न थांबता पळून गेला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य केले.
अपघात झाला तेव्हा गौतमी कारमध्ये होती का?
अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रिक्षाचालकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. पोलीस या अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अवघ्या काही तासात कारसह चालकाला ताब्यात घेतले आहे. कारचालकाने दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील गाडीत नव्हती.
FAQ
1) अपघात कधी आणि कुठे झाला?
अपघात १ ऑक्टोबर २०२५ रोजी (काही स्रोतांनुसार ३० सप्टेंबर) झाला. ठिकाण: पुणे शहरातील नरहे भागातील वडगाव बुद्रुक येथे नवाले ब्रिजवर, एका हॉटेलसमोर मुंबई-बेंगलोर महामार्गावर.
2) अपघात कसा घडला?
गौतमी पाटील यांच्या कारचा ड्रायव्हर कार चालवत असताना पार्क केलेल्या ऑटो-रिक्शाला मागून जोरदार धडक दिली. यामुळे ऑटो-रिक्शाला मोठे नुकसान झाले आणि तीन जण जखमी झाले. ड्रायव्हर अपघातानंतर पळून गेला, पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
3) अपघातात कोण जखमी झाले आणि त्यांची स्थिती काय?
अपघातात तीन जण जखमी झाले: ऑटो-रिक्शाचालक (गंभीर जखमी, उपचार सुरू), आणि ऑटोमधील दोन प्रवासी (सौम्य जखम). स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात नेले. जखमी चालकाच्या उपचार चालू आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.