
Ramdas Kadam allegations on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी 2 दिवस बाळासाहेबांच्या पार्थिवाचा छळ केला असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. हवं तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करा असं जाहीर आव्हानही त्यांनी दिलं आहे. आमचं दैवत असल्याने पायाचे ठसे घेऊन ठेवा असं मी बोललो होतो. तेव्हा हाताचे ठसे घेतले आहेत असं त्यांनीच मला सांगितलं होतं असाही दावा त्यांनी केला आहे. मग त्या हाताच्या ठशांचं काय झालं? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. शरद पवार यांनाही मातोश्रीवर वरती जाऊ दिलं नव्हतं असंही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
‘बॉडीचा 2 दिवस छळ’
रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या निधनाबाबत दसरा मेळाव्यात विधान केल्यानंतर त्यावरुन आता प्रत्यारोप आणि टीका होत आहे. यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत घेत त्यांनी पुन्हा एकदा या आरोपांचा पुनरुच्चार केला. “ते मला बाळासाहेब, शिवसेना काय शिकवणार? बाळासाहेब माझं दैवत आहे. उद्धव ठाकरे कपटी आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा 2 दिवस छळ केला. मी फार जबाबदारीने बोलत आहे. हवं तर माझं आणि उद्धव ठाकरेंचं नार्किटिक्स करावं. दूध का दूध आणि पानी का पानी करावं. मी कधीच खोटं बालत नाही. जे व्हायचं ते होऊन जाऊ दे,” असं जाहीर आव्हान रामदास कदमांनी दिलं आहे.
“मी उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा असं बोललो होतो. तेव्हा हाताचे ठसे घेतले आहेत असं त्यांनी सांगितलं. त्या हातांच्या ठशांचा उपयोग कशासाठी केला हे महाराष्ट्रातील जनतेला कळू दे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘उद्धव ठाकरेंनी जाहीर बोलावं’
पुढे ते म्हणाले “माझ्यावर बोलण्याची औकात आहे का यांची? उद्धव ठाकरेंनी जाहीर बोलावं. 2 दिवस कोणाला वरती पाठवत नव्हते. कोणालाही प्रवेश नव्हता. शिवसेनाप्रमुखांसारखा माणूस असताना डॉक्टर जाहीर करतात, पण इथे मला जाहीर करायला लावलं होतं. मी मर्द माणूस आहे. घाबरणारा नाही. इतकी वर्ष बोललो नाही हे 100 टक्के मान्य आहे. काल ओघाओघातून बोलून गेलो होतो’.
‘…बोलेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल’
“उद्धव ठाकरे बोलतायत तसे नाहीत. वाघाचा मुखवटा घातला असून, ते लांडगा आहेत. बोलण्यासारख्या अनके गोष्टी आहेत. उद्धव ठाकरेंनी बोला सांगितलं नतर नक्की बोलेन. पण ज्यावेळी बोलेन तेव्हा मातोश्रीला हादरा बसेल. माझ्या नादाला लागू नका. मी बाळासाहेबांसोबत दिवस काढले आहेत, हजार वेळा त्यांनी माझी पाठ थोपटली आहे. त्यांच्यासोबत असं घडलं असेल तर वाईट गोष्ट आहे. साहेबांच्या वेळी जे डॉक्टर होते त्यांना विचारावं. सगळा विषय संपेल. मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. मी ते बदलणार नाही. मला प्रसिद्धी नको, बाळासाहेबांच्या बाबतीत तर नकोच आहे”, असंही त्यांनी म्हटलं आहे.
‘शरद पवारांनाही वरती पाठवलं नव्हतं’
“शरद पवारांनाही वरती पाठवलं नव्हतं. अरे मिलिंद का त्यांच्या बॉडीला उद्धव त्रास देत आहे हे त्यांचे शब्द होते. उद्धव ठाकरे तुम्ही हे पाप केलं आहे. उशिरा का होईना महाराष्ट्राला तुमचे धंदे कळू देत. अनके गोष्टी बोलणार नाही, पण वेळ पडली तर सोडणार नाही. बाळासाहेब उद्धव ठाकरेंबद्दल काय बोललेत ते आत आहे, ते बोलायला लावू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा ठसे घेतले की नाही’
“काल जे बोलून गेलो ती चूक नव्हती तर वास्तव आहे. हे घडलं आहे. तुम्ही डॉक्टरांना विचारुन घ्या, की त्यांनी का जाहीर केलं नाही. उद्धव ठाकरेंनी ते सांगावं. तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगा ठसे घेतले की नाही. हळूहळू ते समोर येईल. ही कसली कुत्री भुंकत आहेत. ही अंगावर सोडली आहेत, पण मी घाबरणार नाही. मी भगव्या झेंड्याचा शिपाई म्हणून बाळासाहेबांना साथ दिली आहे. खंबीरपणे पाठीशी उभा राहिलो आहे. माझ्याकडून कदापि असं पाप घडणार नाही. महाराष्ट्राला उद्धव ठाकरे काय आहेत हे हळूहळू कळेस,” असंही सूचक विधान त्यांनी केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.