
ST Bus Jobs MSRTC Recruitment: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळात लवकरच 17 हजार 450 चालक आणि सहायकांची कंत्राटी भरती करण्यात येणार आहे. भविष्यात येणाऱ्या आछ हजार नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात येणार आहे.
ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय
एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी बससेवा सुरळीत ठेवण्यासंदर्भात आवश्यक असलेले चालक व सहायक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) 3 वर्षे कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. 2 ऑक्टोबरपासून त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. भरती झालेल्यांना त्यांना 30 हजार रुपये इतके किमान वेतन मिळेल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
कर्मचाऱ्यांना मिळणार ३० हजार किमान वेतन
ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. या कर्मचाऱ्यांना 30 हजार इतके किमान वेतन देण्यात येणार असून, त्यांना एसटीकडून प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. बसेसची वाढती संख्या व त्यासाठी हवे असणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित, सुरक्षित व दर्जेदार बससेवा पुरवणे शक्य होईल, असा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.
‘दिवाळीनिमित्त 15 हजार रुपये भेट द्या’
एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता, एसटी कामगारांना दिवाळीनिमित्त 15 हजार रुपये भेट, कामगार करारातील तरतुदीनुसार एसटी कामगारांना दिवाळीनिमित्त 12 हजार 500 रुपये सण उचल देण्यात यावी आदी मागण्या महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने केल्या आहेत. कृती समिती आणि एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांच्यात 6 ऑक्टोबर रोजी या मागण्यासंदर्भात बैठक होणार आहे. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय आणि त्याची अंमलबजावणी न झाल्यास 13 ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे.
FAQ
प्रश्न: एसटी महामंडळात कोणत्या प्रकारची भरती होणार आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) 17 हजार 450 चालक आणि सहायकांची कंत्राटी (भाडेतत्त्वावर) भरती लवकरच करण्यात येणार आहे. ही भरती 3 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
प्रश्न: ही भरती का करण्यात येत आहे?
उत्तर: भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने ही भरती करण्यात येत आहे. यामुळे बससेवा सुरळीत आणि सुरक्षित राहील.
प्रश्न: भरती प्रक्रियेचा निर्णय कसा घेण्यात आला?
उत्तर: एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ई-निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर घेण्यासाठी आहे.
प्रश्न: निविदा प्रक्रिया कधी सुरू झाली?
उत्तर: निविदा प्रक्रिया 2 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.