
Ghodbunder Traffice Update: घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. घोडबंदर रोडची ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रशासनाने ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे काम हाती घेतले आहे. सध्याच्या प्रकल्पात हा बोगदा घोडबंदर महामार्ग जंक्शनजवळ बाहेर पडणार असून तिथून पुढे वाढवून सध्या बांधकाम सुरू असलेल्या साकेत-गायमुख कोस्टल रोडला जोडण्यात येणार आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळं महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि बोगद्याच्या रस्ताने जाणारी वाहतूक थेट मुंबई आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या प्रमुख फ्रीवेकडे वळवणे हे उद्दिष्ट आहे.
आधीच्या प्रकल्पाच्या अराखड्यानुसार, बोगद्याचा शेवट हा मुल्लाबाग येथे संपणार होता. मात्र आता बोगद्याचा शेवट सत्यशंकर सोसायटीरपासून ते घोडबंदर हायवेपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा बोगदा आता अंदाजे 4 किमीपर्यंत पुढे वाढवला जाणार आहे. तसंच, कोस्टल रोडच्या रेषेच्या आधीच बोगदा सुरू होऊन शहरातील इतर रस्त्यांशी जोडला जाणार आहे.
दुहेरी बोगद्याला थेट कोस्टल रोडशी जोडल्याने, शहराबाहेर जाणाऱ्या वाहतुकीसाठी एक मार्ग उपलब्ध होईल. ज्यामुळे शहरांतर्गत येणाऱ्या प्रवाशांसाठी महामार्ग मोकळा राहील.
या प्रकल्पाचे फायदे?
पश्चिम द्रुतगती महामार्ग ते नाशिक हायवे, नवी मुंबई, JNPT व पूर्व मुंबई उपनगरांसाठी मार्ग मिळेल. तसंच, ठाणे शहरातील कापुरबावडी आणि माजीवडा जंक्शनवरील गर्दी कमी होईल.
ठाणे-बोरिवलीदरम्यान 11.85 किमी लांबीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीएकडून केली जाणार आहे. या मार्गावर 10.25 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून हा बोगदा जाणार आहे. या बोगद्यासाठी 18,838 कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे बोलले जातेय. तसंच, याला महत्त्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. या बोगद्यामुळं ठाणे ते बोरीवली प्रवास अवघ्या 12 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसंच, घोडबंदरची वाहतूककोंडीदेखील कमी होणार आहे.
FAQ
प्रश्न १: घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रशासन काय करत आहे?
उत्तर: घोडबंदर रोडची ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रशासनाने ठाणे-बोरीवली दुहेरी बोगद्याचे काम हाती घेतले आहे. हा बोगदा घोडबंदर महामार्ग जंक्शनजवळ बाहेर पडणार असून, तिथून पुढे साकेत-गायमुख कोस्टल रोडला जोडण्यात येणार आहे.
प्रश्न २: या बोगदा प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
उत्तर: या निर्णयामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि बोगद्याच्या रस्ताने जाणारी वाहतूक थेट मुंबई आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या प्रमुख फ्रीवेवर वळवली जाईल.
प्रश्न ३: बोगद्याच्या मार्गात काय बदल करण्यात आले आहेत?
उत्तर: आधीच्या अराखड्यानुसार, बोगद्याचा शेवट मुल्लाबाग येथे संपणार होता. मात्र आता बोगद्याचा शेवट सत्यशंकर सोसायटीरपासून ते घोडबंदर हायवेपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा बोगदा आता अंदाजे ४ किमीपर्यंत पुढे वाढवला जाणार आहे. तसेच, कोस्टल रोडच्या रेषेच्या आधीच बोगदा सुरू होऊन शहरातील इतर रस्त्यांशी जोडला जाणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.