
मुंबई18 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
समिरा हॅबिटॅट्स यांच्या सौजन्याने आणि टाइम्स ऑफ इंडिया व ऑप्टिमल मिडिया सोल्यूशन्स यांच्या सहकार्याने सादर झालेला बॉम्बे टाइम्स फॅशन वीक २०२५ तीन दिवसांच्या अफलातून फॅशन फिएस्टाद्वारे अप्रतिमरीत्या संपन्न झाला.
नवनवीन कल्पना, पारंपरिकतेचा आधुनिक आविष्कार आणि सेलिब्रिटींच्या झळाळीने भारलेले हे तीन दिवस भारताच्या स्टाइल जगतातील एक भव्य उत्सव ठरले.
पहिला दिवस — परंपरेची मोहक सुरुवात
सोहळ्याची सुरुवात डोनीअर च्या शो ने झाली, जिथे अभिनेता सनी सिंगने पारंपरिक कलाकुसर आणि आधुनिक सिल्हूट यांचं संतुलित सादरीकरण साकारलं.
त्यानंतर ईझ परफ्यूम्स प्रेझेंट्स बेसिल लीफ या शोमध्ये हर्लिन सेठीच्या सौम्य आणि नाजूक अंदाजाने रॅम्पला ताजेपणा लाभला.
व्हिसलिंग वूड्स च्या सादरीकरणाने दिवसाला कलात्मक वळण मिळालं — राजेश्री देशपांडे आणि रेहान रॉय यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या या कलेक्शनने व्यक्तिमत्व आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा केला.
मार्क्स अँड स्पेन्सर ने आंतरराष्ट्रीय स्टाइलची झलक दाखवत एक बहुपयोगी, समकालीन कलेक्शन सादर केलं.
संध्याकाळी किशनदास अँड कंपनी आणि गौरांग शाह यांच्या सहकार्याने रंगलेला शो विशेष ठरला — माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रॅम्पवर चालत आत्मविश्वास आणि अभिजाततेचा अद्वितीय संगम साकारला.
त्या रात्रीचा शेवट रिलायन्स ज्वेल्स प्रेझेंट्स बैली बाय अनु ने केला, जिथे मौनी रॉयने पारंपरिक वारशाची झलक आधुनिकतेच्या सौंदर्यात मिसळत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं.
“बॉम्बे टाइम्स फॅशन वीक नेहमीच स्टाइल आणि ग्लॅमरचा उत्सव राहिला आहे,” असं ऑप्टिमल मिडिया सोल्यूशन्सचे अध्यक्ष समीर सैनी यांनी सांगितलं. “या वर्षी डिझायनर्सनी भारतीय परंपरेची रंगत आणि हेरिटेज-प्रेरित कुत्यूर नव्या दृष्टिकोनातून साकारली. हे व्यासपीठ सर्जनशीलता, कौशल्य आणि सांस्कृतिक समृद्धीचं सुंदर प्रतिबिंब ठरलं.”
दुसरा दिवस — क्राफ्ट, सिनेमॅटिक ग्लॅमर आणि रॅम्पवरील राजेशाही
दुसऱ्या दिवशी प्रेम्या बाय मनिषी साठी क्रिस्टल डिसुझाने युवावर्गीय अभिजाततेचा मोहक आविष्कार साकारला, तर प्रतीक बब्बर आणि प्रिया बनर्जी यांनी बेस्पोकवाला बाय हिमाली राज मध्ये आधुनिकतेचा चैतन्यदायी अंदाज आणला.
द सॅफ्रॉन हाऊस च्या शोमध्ये अदिती राव हैदरीने तिच्या रॅम्प वॉकने शालीनतेचा आणि भव्यतेचा मंत्र घातला.
डॅपर अँड डेअर ने फॅशनला नव्या उर्जेचा स्पर्श दिला — टेरेन्स लुईस आणि दिव्या अग्रवाल यांच्या नृत्यात्मक शोकेसमध्ये स्टाइल आणि मूव्हमेंटचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळाला.
वेडिंग्ज बाय रेमंड ने आधुनिक वरासाठी सुबक आणि स्टायलिश कलेक्शन सादर केलं, ज्यात सनी कौशल शोस्टॉपर म्हणून झळकले.
त्या रात्री एसएस बाय सीमा सिंग च्या शोने संपूर्ण रॅम्पला स्टारडमची झळाळी दिली — वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्या शानदार उपस्थितीने दिवसाचा समारोप ग्लॅमरस पद्धतीने झाला.
“समिरा हॅबिटॅट्सच्या थिंक टँक ने म्हटलं, ‘आमचं सहकार्य अशा कार्यक्रमाशी आहे जो आमच्या ब्रँड इथॉसशी पूर्णपणे सुसंगत आहे. आमच्या अलीबागमधील प्रकल्पांप्रमाणेच बॉम्बे टाइम्स फॅशन वीक ही निवडक, उत्कृष्ट आणि कालातीत जीवनशैलीची झलक आहे.’”
अंतिम दिवस — सिनेमॅटिक झळाळी आणि हाय-ऑक्टेन फॅशन
फिनालेच्या दिवशी सकाळची सुरुवात लॅक्मे अकॅडमी पॉवर्ड बाय अपटेक प्रेझेंट्स राजदीप राणावत ने केली, जिथे लॉरेन गॉटलिब आणि शांतनू महेश्वरी यांनी त्यांच्या करिश्माई उपस्थितीने रॅम्प उजळवला.
यानंतर हाऊस ऑफ आंचल साठी एलनाझ नारूझीने आधुनिक स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करणारा लूक सादर केला.
दुपारी उर्वशी रौतेला हायात कुत्यूर बाय निक्की साठी झळकली, सुर्भी चंदनाने पूजा प्रणय साठी तिच्या मोहकतेने सगळ्यांची मने जिंकली, आणि सोनाली जैनच्या शोसाठी चाललेल्या सुश्मिता सेनच्या शालीन वॉकला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं.
संध्याकाळी नील नितिन मुकेश एसआर क्वीन्स मिडिया प्रेझेंट्स क्षितिज चौधरी साठी तर चित्रांगदा सिंग अॅस्पेक्ट प्रेझेंट्स अर्चना कोचर साठी रॅम्पवर झळकल्या — दोघींनीही एलिगन्स आणि टाइमलेस अपीलचा अप्रतिम मिलाफ साकारला.
ग्रँड फिनालेमध्ये नचिकेत बर्वे यांच्या कलेक्शनने फॅशन वीकचा सोहळा भव्यतेच्या शिखरावर नेला. हुमा कुरेशीच्या कुत्यूर मास्टरपीस लूकने संपूर्ण प्रेक्षकवर्ग मंत्रमुग्ध झाला — सर्जनशीलता, परंपरा आणि सिनेमॅटिक जादूचा परिपूर्ण मिलाफ साधत या वर्षाच्या फॅशन वीकला सुंदर पूर्णविराम मिळाला.
डिजिटल जगतातही झळकले फॅशनचे रंग
या तीन दिवसांत बबल कम्युनिकेशन ने सर्व डिझायनर्ससाठी मिडिया आणि इन्फ्लुएंसर मार्केटिंगची जबाबदारी सांभाळत प्रत्येक लूक, प्रत्येक क्षण डिजिटल आणि सोशल प्लॅटफॉर्मवर प्रभावीपणे पोहोचवला.
“बॉम्बे टाइम्स फॅशन वीक ही फक्त फॅशनची झलक नाही, तर देशभरातील विविध डिझायनर्स, कलाकार, मिडिया आणि इन्फ्लुएंसर्सना एकत्र आणणरी एक सांस्कृतिक चळवळ आहे” असं बबल कम्युनिकेशनच्या संचालिका आरती नॉटियाल म्हणाल्या. “आमच्यासाठी हा अनुभव म्हणजे स्टाइल आणि क्रिएटिव्हिटीचा उत्सव व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा सन्मान आहे.”
आधुनिकता, परंपरा आणि स्टार पॉवर यांचा सुंदर संगम साधत बॉम्बे टाइम्स फॅशन वीक २०२५ ने प्रेक्षकांना प्रेरणा देत आणि पुढील आवृत्तीची उत्कंठा वाढवत फॅशन जगतात नवा मापदंड निर्माण केला !
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited