
Navi Mumbai Airport Transport: नवी मुंबई विमानतळाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. भारतातील पहिले परिपू्र्ण मल्टिमोडल विमानतळ असून या प्रकल्पामुळं उत्पन्न, रोजगार, रिअल इस्टेट आणि व्यवसाय संधींना नवीन गती मिळेल. नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी सर्व सोयी सुविधा उभारण्यात येणार आहे. लोकल, मेट्रो, वॉटर टॅक्सी अशा सुविधा थेट नवी मुंबई विमानतळाला जोडण्यात येणार आहेत.
द्रुतगती महामार्ग, मेट्रो, उपनगरीय रेल्वे, वॉटर टॅक्सी, इत्यादींद्वारे कनेक्टिव्हिटी लाभलेले देशातील पहिले बहुउद्देशीय विमानतळ आहे. तसंच, दोन स्वतंत्र धावपट्टयांसह प्रत्येक धावपट्टीकरिता दोन समांतर टॅक्सी वे करण्यात येणार आहे.
नवी मुंबईला पोहोचण्यासाठी कोणते पर्याय असतील?
मुंबई उपनगरीय लोकल
नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी हार्बर मार्गावरील सगळ्यात जवळचे स्थानक तरघर हे आहे. या रेल्वे स्थानकांचे काम पूर्ण झाले असून लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. सीवूड्स किंवा बेलापूरवरुन उरणला येऊन तिथून दुसरी लोकल पकडून तरघर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचता येईल.
बस सेवा
शटल बस: नेरूळ, सीवूड्स, बेलापूर, तलोजा आणि तारघर रेल्वे स्टेशनांपासून शटल बस चालवल्या जातील. तारघर स्टेशन जवळचे आहे (अंतर: 5-10 किमी, वेळ: 15-20 मिनिटे). दर: ₹50-100
NMMT बस: 50 एअर-कंडिशन बस सेवा वाशी, थाणे आणि मुंबईतून विमानतळापर्यंत सुरू होत आहेत. दर: ₹100-200. वेळ: 30-60 मिनिटे (भागानुसार).
रस्ते मार्गे कसं पोहोचाल?
वाशीपासून: पाम बीच रोड → बेलापूर-उलवे रोड मार्गे. अंतर: 14 किमी. वेळ: 30 मिनिटे. (CIDCO थेट कनेक्टर तयार करत आहे.)
नेरूळ/सीवूड्स/बेलापूरपासून: थेट बेलापूर-उलवे रोड. अंतर: 10-15 किमी. वेळ: 20-30 मिनिटे.
तळोजापासून: शिळफाटा रोड → सायन-पनवेल महामार्ग → उल्वे-बेलापूर रोड. अंतर: 20-25 किमी. वेळ: 40-50 मिनिटे.
अटल सेतूवरुन कसं जायचं?
अटल सेतू हा दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा शेवाशी जोडतो. त्यामुळं अंतर कमी होणार आहे. दक्षिण मुंबईतील नागरिक फक्त 30 ते 40 मिनिटांत उलवे येथे पोहोचू शकणार आहेत.
प्रस्तावित प्रकल्प
मेट्रो
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ जोडण्यासाठी मेट्रोची जोडणी करण्यात येणार आहे. गोल्डन मेट्रो मार्गिका 8 उभारण्यात येणार आहे. या मार्गिकेमुळं दोन्ही विमानतळामधील प्रवास दोन तासांनी कमी होऊन थेट 30 मिनिटांवर येणार आहे. ही मेट्रो 2030 पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
वॉटर टॅक्सी
नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी वॉटर टॅक्सीची घोषणा करण्यात आली आहे. या हायस्पीड वॉटर टॅक्सीच्या माध्यपातून मुंबईहून आता नवी मुंबई विमानतळ फक्त 20 मिनिटांत गाठता येणार आहे. तर, ठाणे ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास फक्त 17 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ जेट्टी उभारली जाणार आहे.
उन्नत मार्ग
ठाणे-नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी 25.2 किमी लांबीच्या उन्नत मार्गाचा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रकल्प ठाणे येथील धन निरंकारी चौकाजवळील पटनी मैदानापासून वाशीयेथील पाम बीच रोडपर्यंत 6 लेनचा म्हणजे तीन अधिक लेनचा असणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.