
Yogesh Kadam on Weapon License Sachin Ghaywal: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याचा भाऊ सचिन घायवळला (Sachin Ghaywal) शस्त्र परवाना मंजूर केल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांचा अहवाल डावलून शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी अनिल परब यांनी केली आहे. अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत योगेश कदमांनी कशाप्रकारे नियम डावलत सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केला याचा घटनाक्रम उलगडून सांगितला आहे. दरम्यान यानंतर योगेश कदमांनी यावर प्रतिक्रिया देत 2015 ते 2025 पर्यंत त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.
मी परत सांगतो गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला मी परवाना दिला नाही असा दावा योगेश कदम यांनी केला आहे. या खुर्चीवर बसल्यापासून गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केलेली नाही असंही ते म्हणाले आहेत. तसंच गरज पडल्यास आज पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देईन असंही सांगितलं आहे.
“त्यांना कदाचित माहिती नसेल की लायसन्स जेव्हा दिलं जातं ते संबंधित पोलिस आयुक्त यांच्या सहीनेच होते. मी सविस्तर माहिती आवश्यक असल्यास आजच पत्रकार परिषद घेऊन देणार आहे. जे काही मी सोशल मीडियाच्या माध्यमातूम स्पष्टीकरण दिलं आहे त्यावरुन जे विरोधक टीका करत आहेत त्यांना सांगू इच्छितो की, या खुर्चीवर बसल्यापासून गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला मी शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केलेली नाही. या भूमिकेवर मी ठाम आहे. गुन्हे प्रवृत्तीला पुढे आणण्याचं काम आमच्याकडून आजपर्यंत झालं नाही आणि यापुढेही होणार नाही,” असं योगेश कदम म्हणाले आहेत.
“मी प्रलंबित गुन्हे किंवा इतर गुन्हे असलेल्या व्यक्तींना परवाना देण्याची शिफारस केलेली नाही. जे काही आरोप होत आहेत याची सर्व सविस्तर माहिती कागदपत्रांसह सर्वांना देईन. प्रलंबित गुन्हे दाखल व्यक्तीला खुर्चीवर बसल्यापासून शिफारस केलेली नाही. माझ्याकडून गुन्ह्याला प्रोत्साहन देण्याचे काम होणार नाही. मी खुर्चीवर असल्यापासून हे केलेलं नाही आणि करणारही नाही,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे ते म्हणाले, “ज्यावेळी अपील केली जाते तेव्हा ती वैयक्तिक असते. तो कोणाचा नातेवाईक आहे, संबंध आहेत, नातेवाईक कोण या आधारावर होत नाही. सचिन घायवळवर जे काही गुन्हे दाखल होते त्या प्रकरणी 2019 ला कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2015-25 पर्यंत त्याच्यावर एकही गुन्हा दाखल नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन मी हा निर्णय घेतला आहे”.
शिक्षक व व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते, त्यामुळे त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला आहे असं स्पष्टीकरण याआधी (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं होतं.
गृह राज्यमंत्री म्हणाले, उपलब्ध कागदपत्रं आणि मा. न्यायालयाच्या न्यायनिर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून, नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. म्हणूनच, सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीलासंदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहे.
FAQ
1) सचिन घायवाळ हे कोण आहेत आणि निलेश घायवाळशी संबंध काय आहे?
सचिन बन्सिलाल घायवाळ हे पुण्यातील शिक्षक आणि व्यावसायिक आहेत, ज्यांना घायवाळ गँगमधील प्रमुख व्यक्ती म्हणून ओळखले जाते. कुख्यात गुंड निलेश बन्सिलाल घायवाळचe भाऊ आहे, ज्यावर अनेक प्रकरणे दाखल आहेत, ज्यात कोथरूड फायरिंग प्रकरण आणि २०२५ मध्ये खोटी पासपोर्ट आणि आधार कार्ड वापरून लंडनला पळून जाण्याचा समावेश आहे.
2) सचिन घायवाळ यांच्यावरील गंभीर आरोप काय आहेत?
सचिनवर हत्या करण्याचा प्रयत्न आणि शस्त्र कायद्याचे उल्लंघन यासारखे गंभीर प्रलंबित आरोप आहेत. पुणे पोलिसांनी २० जानेवारी २०२५ रोजी त्यांच्या शस्त्र परवाना अर्जाला नाकारण्याचे कारण म्हणून हे आरोप नमूद केले होते.
3) शस्त्र परवान्याभोवतील मुख्य वाद काय आहे?
वादाचा केंद्रबिंदू असा आहे की, योगेश कदम यांनी पोलिसांच्या शिफारशी आणि प्रक्रियात्मक नियमांचे उल्लंघन करून सचिनला परवाना दिला, जरी त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संघटनात्मक गुन्हेगारीशी असलेल्या कुटुंबीय संबंध असूनही. विरोधी नेते, जसे की माजी आमदार रवींद्र धगेकर आणि शिवसेना (युबीटी) नेते अनिल परब, यांनी याला पक्षपात म्हणून टीका केली आहे, कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि घायवाळ गँगच्या संबंधित गुन्हेगारी क्रियाकलापांची चौकशीची मागणी केली आहे, जसे की घायवाळ गँगच्या अनधिकृत मालमत्तांचा मुद्दा. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत कदम यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून राजीनाम्याची मागणी केली
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.