
महेंद्र मुधोळकर, झी मीडिया, बीड : (Marathwada Floods) अतिवृष्टी आणि त्यानंतर झालेल्या पुरामुळं मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याच्या प्रवाहात खरवडून गेल्या, बहर आलेली पिकं पुरात आडवी झाली. अनेकांचे घर-संसारही वाहून गेले आणि हा निसर्गाचा कहर इतक्यावरच थांबला नाही, तर आता याच मराठवाड्यातील निसर्गसौंदर्यानं नटलेल्या एका गावाला याच निसर्गामुळं धोका उद्भवताना दिसत आहे.
धोक्याच्या गर्त छायेत असणारं हे गाव म्हणजे कपिलधारवाडी. काही दिवसांपूर्वीच या गावातील बहुतांश ठिकाणी जमीन खचल्याच्या घटना घडल्या. ज्यानंतर कपिलधारवाडीकडे जाणारा मुख्य रस्तासुद्धा बंद करण्याच्या निर्देशवजा सूचना प्रशासनानं दिल्या.
परिस्थितीचं गांभीर्य पाहता गावकऱ्यांनीसुद्धा आपल्याला सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याची मागणी केलेली असतानाच आता चिंतेत भर टाकणारी माहिती नव्यानं समोर आली आहे. बीडच्या कपिलधारवाडी इथं उद्भवलेल्या भूस्खलनजन्य परिस्थितीचा आढावा नुकताच भारतीय भूगर्भ सर्वेक्षण पुणे विभागाच्या पथकाकडून घेण्यात आला. जीएसआयचे संचालक मेगो चासी आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक संदीप कुमार शर्मा यांनी भूस्खलनाचे मुख्य कारण स्पष्ट केलं.
कपिलधारवाडीमध्ये का होतंय भूस्खलन?
सदर ठिकाणी (या गावात) जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नाही. बारीक मातीच्या तुकड्यांनी समृद्ध असलेल्या या भागात पाणी झिरपून भूपृष्ठाखाली साठत आहे. यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरू झाली असून ती काही काळ पुढेही सुरू राहण्याची शक्यता पथकाने वर्तवली आहे.
थोडक्यात राज्यातील या भागाला बहुआयामी धोका निर्माण झाल्याचं जीएसने नमूद केले. ज्यामुळं उतारावर असणारे मातीचे थर त्यांचं मूळ स्थान सोडत असून, काही ठिकाणी दगड आणि दरड कोसळत आहे. नदीच्या प्रवाहामुळे जमिनीची धूपही होत आहे. ज्यामुळं या धोकाग्रस्त भागात ‘स्लाईडक्षेत्रा’च्या तीन ते चार कुटुंबं सर्वाधिक प्रभावित असल्याचं नमूद करण्यात आलं. ज्यामुळं आता बाधितासह इतर कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी पुढील अहवाल सादर केला जाईल.
FAQ
मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे काय नुकसान झाले?
अतिवृष्टी आणि पुरामुळे मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याच्या प्रवाहात खरवडून गेल्या, बहर आलेली पिके पुरात आडवी झाली.
कपिलधारवाडी गावाला सध्या कोणता धोका निर्माण झाला आहे?
बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी गावाला भूस्खलनाचा धोका उद्भवला आहे. काही दिवसांपूर्वी गावातील बहुतांश ठिकाणी जमीन खचली असून, प्रशासनाने गावाकडे जाणारा मुख्य रस्ता बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
कपिलधारवाडीमध्ये भूस्खलनाचे मुख्य कारण काय आहे?
गावात जमिनीच्या पृष्ठभागावरील पाण्याचा निचरा करण्यासाठी नैसर्गिक ड्रेनेज प्रणाली अस्तित्वात नाही. बारीक मातीच्या तुकड्यांनी समृद्ध असलेल्या भागात पाणी झिरपून भूपृष्ठाखाली साठते, ज्यामुळे भूस्खलनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.