
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी अॅक्शन घेतली आहे. नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे ंना गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात संशयित मानत अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारपा
.
गंगापूर रोड परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात भाजप नेते मामा राजवाडे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते. या घटनेत जुन्या वैमनस्यातून दोन जणांवर गोळीबार करण्यात आला होता. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्यात आधीच भाजप नेते सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल याला अटक करण्यात आली आहे. तर इतर काही आरोपी अजूनही फरार आहेत. तपासादरम्यान मामा राजवाडे यांचे नाव समोर आले आणि नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांना गुरुवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आले.
पोलिसांनी 15 तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. नाशिक क्राईम ब्रँचकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात वापरलेले हत्यार कोणाच्या सांगण्यावरून आणले गेले, याचा तपास सुरु आहे. याच प्रकरणात मामा राजवाडे यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. फडणवीस यांच्या दौऱ्याच्या आदल्या रात्री झालेल्या या कारवाईमुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश, पण वाढल्या अडचणी
मामा राजवाडे हे पूर्वी ठाकरे गटाचे नाशिक शहर महानगरप्रमुख होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटाचा निरोप घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपने त्यांचा प्रवेश मोठ्या उत्साहात केला होता. मात्र, आता त्यांच्या अटकेमुळे भाजपच्या इनकमिंग मोहिमे वर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. राजवाडे हे भाजप नेते सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. भाजपमध्ये प्रवेश करतानाच राजवाडे यांनी पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाची भेट घेऊन शुद्धीकरण झाले असा दावा केला होता. पण विरोधकांनी त्यावर तात्काळ टीका केली होती. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक भाजपमध्ये शिरत आहेत, त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता.
काही महिन्यांपासून भाजपने इनकमिंग मोहिम राबवली
आता त्याच आरोपाला काही प्रमाणात खतपाणी मिळाले आहे. कारण, मामा राजवाडे यांच्या अटकेमुळे नाशिकमधील भाजप नेतृत्व बचावात्मक भूमिकेत गेले आहे. फडणवीसांच्या दौऱ्याच्या आदल्या दिवशीच झालेल्या या घटनेमुळे प्रशासन आणि पक्ष दोन्हींसाठी अडचणी वाढल्या आहेत. नाशिकमध्ये गेल्या काही महिन्यांपासून भाजपने इनकमिंग मोहिम राबवली आहे. विरोधकांना धक्का देण्यासाठी अनेक वादग्रस्त नेत्यांना पक्षात घेतले जात आहे. याच मोहिमेत मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांसारख्या नेत्यांनीही प्रवेश केला. परंतु, आता पोलिसांनी या नेत्यांकडे गुन्हेगारी नजरेने पाहायला सुरुवात केली आहे.
राजवाडेंच्या अटकेनंतर फडणवीसांच्या दौऱ्यातही याचा प्रभाव
राजकारणात प्रवेश करून आपली जुनी पार्श्वभूमी झाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता पोलिसांचा फास आवळला जात आहे. त्यामुळे नाशिकमध्ये भाजप गुन्हेगारांना आश्रय देते का? या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. राजवाडे यांच्या अटकेनंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले की, भाजपचा गुन्हेगारीतून आलेला क्लीन इमेजचा दावा फोल ठरला आहे. राजवाडेंच्या अटकेनंतर फडणवीसांच्या दौऱ्यातही याचा प्रभाव दिसून येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, राजवाडे हे स्थानिक स्तरावर प्रभावशाली मानले जातात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नाशिकमधील गुन्हेगारी आणि पोलिसांचा कडक मोर्चा
गेल्या काही आठवड्यांपासून नाशिक शहर गुन्हेगारी घटनांनी हादरले आहे. गंगापूर रोडनंतर आता सातपूर गोळीबार प्रकरणानेही पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सातपूर येथील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी लोंढे टोळीतील देवेश शिरताटे आणि शुभम गोसावी या दोघांना अटक केली आहे. तर प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे हे दोघे आधीच पोलीस कोठडीत आहेत. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी आता राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तींवरही कारवाई सुरू केली आहे. मामा राजवाडेंच्या अटकेनंतर नाशिक पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की, कोणाचेही राजकीय संरक्षण असले तरी गुन्हेगारीला पाठीशी घातले जाणार नाही.
फडणवीस यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाढले तणावाचे वातावरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा हा उत्तर महाराष्ट्रातील भाजप संघटनात्मक तयारीचा भाग मानला जात होता. मात्र, या दौऱ्याच्या काही तास आधीच झालेल्या या अटकेमुळे प्रशासन आणि पक्ष दोघांनाही संकटात टाकले आहे. राजवाडे हे स्थानिक पातळीवर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना जोडणारे नेते मानले जातात. त्यांच्या अटकेनंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढली असून, फडणवीसांच्या सभेच्या सुरक्षेची जबाबदारीही वाढली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.