
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना विरोधकांवर आणि विशेषतः उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. जिथे आपत्ती तिथे शिवसेना आणि जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे आहे, असा विश्वास त्या
.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या. कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, विरोधी पक्षांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांवर त्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर हा घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य सरकार आहे, असे आरोप होत होते. सरकार परवा जाईल, तेरावा जाईल असे म्हणत होते. तुम्हालाही भीती वाटली असेल, परंतु त्यांचा ज्योतिषी बोगस होता, असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी यावेळी लगावला. त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवरूनही टोला मारत कार्यकर्त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचा मंत्र दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले, मी आपल्याला एवढाच सांगतो की, विरोधी पक्षात कोण कुणाशी मनोमिलन करत आहे याची चिंता करू नका. त्यांची सगळी गणित, समीकरण आपल्याकडे आहेत, असे म्हणत नाव न घेता ठाकरे बंधूंच्या युतीवर शिंदेंनी टोला लगावला. आपण महायुती म्हणून लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जिंकली, महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था देखील जिंकणार आहोत. काल ब्रिटनचे पंतप्रधान आले म्हणाले, एकनाथ शिंदेचे बॅनर लावले, पाहुण्यांचा पाहुणचार करण्याची आपली संस्कृती आहे. आत्तापर्यंत दिल्लीत बैठक होत होत्या, पण मुंबईत पहिल्यांदा झाली आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही पोस्टवर, फिल्डवर असतो, तुमच्यासारख एसीमधे चिल्ड होत नसतो, असाही टोला शिंदेंनी लगावला. आमच्याकडचे काही लोक लंडनला येतात त्यांच्यावर लक्ष ठेवा, सारख्या फेऱ्या मारतात. तिकडून जाऊन आले की इकडे म्हणतात, माझे हात रिकामे, माझ्याकडे देण्याखारखे काही नाही. सगळ तिकडे जाऊन जमा केल्यावर हातात कसे काय राहणार, अशी बोचरी टीका शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या लंडन दौऱ्यावरून केली आहे.
हंबरडा फोडणार म्हणाले, शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याऐवजी राजकारण करत आहेत. मात्र, राजकारण करायला जागा कुठे आहे. हंबरडा कधी फोडला 2022 ला सगळे गेले तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला, सगळे गेले, आता काय राहिले. आता मुंबई बाकी आहे त्यासाठी आवाज बाकी ठेवा मोठा हंबरडा फोडायचा आहे, अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच, आपण 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या, त्यांनी 100 जागा लढवून 20 जागा जिंकल्या आहेत, त्याहीवेळी त्यांनी हंबरडा फोडला होता. शेतकऱ्यांबद्दल जाणीव असली पाहिजे, शेतकऱ्याबद्दल वेदनाची जाणीव असली पाहिजे, आम्ही 32 हजार कोटींचे पॅकेज दिले, असेही शिंदेनी यावेळी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.