
सततची नापिकी, कधी पाणीटंचाई तर कधी अतिवृष्टीने त्रस्त असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड जिल्ह्यांसह राज्यातील नऊ जिल्ह्यांची केंद्राच्या महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेत’ (पीएमडीडीकेवाय) निवड करण्यात आली आहे. क
.
पुढील सहा वर्षे चालणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेत देशातील १०० आणि राज्यातील या ९ जिल्ह्यांसाठी दरवर्षी तब्बल २४,००० कोटींचा निधी खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या ९ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या योजनेसाठीचा आराखडा चार महिन्यांपूर्वी तयार झाला. त्यासाठी महाराष्ट्रातील काही कृषी तज्ज्ञ, अभ्यासकांची मते जाणून घेण्यात आली होती.
संभाजीनगरसाठी विशेष लक्ष
या योजनेचा मुख्य उद्देश शेतीत सुधारणा, उत्पादन वाढ आणि शाश्वत शेतीला चालना देणे हा आहे. संभाजीनगर जिल्ह्यात धान्य साठवणूक सुविधा, प्रक्रिया युनिट्स आणि सिंचन सुधारणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. कृषी कर्जाची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर कृषी संलग्न रोजगार निर्मितीलाही मोठा वाव मिळणार आहे. योजनेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. जिल्हा मुख्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि ग्रामपंचायत स्तरावर छत्रपती संभाजीनगरमध्येही त्याचे आयोजन केले जाईल. त्यात प्रगतिशील शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञ सहभागी होतील, असेही भरणे म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.