
Nagpur Crime News : नागपुरात पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तीन मुलींना सुरक्षित वाचवले आहेत. शहरातील एका शांत निवासी भागातील प्रमिला प्रकाश हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर हा धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करत तीन मुलींना सुरक्षितपणे वाचविण्यात आलं आहे. (Nagpur sex racket in a residential area 3 girls and arresting 2 suspects Crime News in marathi)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेक्स रॅकेटमध्ये मुलींना पैशाचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. या रॅकेटचा मास्टरमॅन तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवत होता. त्यानंतर या मुलींकडून तो देहविक्री करुन घेत होता. पोलिसांनी या सेक्स रॅकेटमध्ये दोन मुख्य आरोपींनी गजाआड केलं आहे. या आरोपींचं नाव कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला असं आहे. या आरोपींना पोलिसांनी हॉटेलमधून अटक केली आहे.
…असा केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना त्या हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या प्रकरणाचा भांडाफोड केला. बनावट ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने तिथल्या लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यावेळी या हॉटेलमधील कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला या दोघांनी चालवलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यानंतर बनावट ग्राहकांनी पोलिसांनी त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी हॉटेलवर छापा मारला.
नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने माहिती दिली की, ऑपरेशन शक्ती मोहीमेतर्गंत ही कारवाई करण्यात आली असून गेल्या काही महिन्यांपासून शहरात मानव तस्करी आणि सेक्स रॅकेटविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. या छाप्यात हॉटेलचे सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर आणि इतर पुरावेही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण रॅकेटचे नेटवर्क उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी पुढे सांगितलं की, या छाप्यातून हेही समोर आलंय की, रॅकेट संचालक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलींना सहजपणे फसवतात. तसंच त्यांच्यावर दबाव टाकतात.
FAQ
प्रश्न 1: ही घटना कुठे आणि कशाबाबत आहे?
उत्तर: नागपूर शहरातील एका शांत निवासी भागात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी प्रमीला प्रकाश हॉटेलवर छापा टाकून तीन मुलींना सुरक्षितपणे वाचवले आणि दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई ‘ऑपरेशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत करण्यात आली.
प्रश्न 2: सेक्स रॅकेटचे संचालक कोण होते आणि त्यांचे कृत्य काय होते?
उत्तर: रॅकेटचे मुख्य संचालक कांचन नीमजे आणि दीपक हेमंत कुमार शुक्ला हे आहेत. ते तरुणींना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून फसवत होते आणि त्यांच्याकडून देहविक्री करवून घेत होते. पोलिसांनी त्यांना घटनास्थळीच अटक केली.
प्रश्न 3: रॅकेट कसा उघडकीस आला?
उत्तर: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून हॉटेलमध्ये तपास केला. बनावट ग्राहकाने हॉटेलमध्ये संभाषण केल्यानंतर रॅकेटचे सर्व कृत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला आणि तीन मुलींना बाहेर काढले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.