digital products downloads

भरदिवसा धाडस: फ्लॅटमध्ये घुसून सशस्त्र लूट, महिला‎जखमी तर पोलिसांकडून आरोपी मूक्त‎, माेहाडी राेडवरील घटना, आरोपी पळाल्याचा संशय‎ – Jalgaon News

भरदिवसा धाडस:  फ्लॅटमध्ये घुसून सशस्त्र लूट, महिला‎जखमी तर पोलिसांकडून आरोपी मूक्त‎, माेहाडी राेडवरील घटना, आरोपी पळाल्याचा संशय‎ – Jalgaon News


सुरक्षारक्षक म्हणून केलेल्या कामाच्या‎ओळखीचा गैरफायदा घेत मोहाडी‎रस्त्यावरील उच्चभ्रू वस्तीतील‎अपार्टमेंटमध्ये शिरून महिलेला चाकूचा‎धाक दाखवत लुटण्याचा धाडसी प्रयत्न‎सोमवारी दुपारी करण्यात आला. यावेळी‎हिम्मत दाखवत त्या महिलेने स्वत:चा‎बचाव केला; मात्

.

गोकुळ हंसराज राठोड असे या‎हल्लेखोराचे नाव असून तो चाळीसगाव‎तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी‎आहे. दीड वर्षांपूर्वी त्याने मोहाडी‎रस्त्यावरील बालाजी हाइटस् या‎अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम‎केले होते. त्यामुळे तिथल्या रहिवाशांशी‎त्याची ओळख होती. त्याचाच गैरफायदा‎घेत तो सोमवारी दुपारी दोन वाजेच्या‎सुमारास पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या‎आरोही इंद्रकुमार ललवाणी (वय ३८)‎यांच्या घरी गेला. उर्वरीत. पान ४‎

अनेक अपार्टमेंटच्या बाहेर सुरक्षारक्षक नियुक्त असतात. पण ते बाहेरुन येणाऱ्या लोकांना‎केवळ कोणाकडे जायचे एवढेच विचारतात. काही ठिकाणी नावही लिहून घेतले जाते.‎पण तेवढ्याने अशा घटना टाळता येणार नाहीत. त्यासाठी बाहेरून येणारी व्यक्ती ज्या‎व्यक्तीकडे जायचे सांगते त्या व्यक्तीस फोनवरून विचारल्याशिवाय अगंतुकांना इमारतीत‎प्रवेश मिळणार नाही, अशी व्यवस्था केली तरच पुन्हा असे प्रकार घडणार नाहीत.‎

सोडले की पळून गेला?‎

अनधिकृतपणे घरात प्रवेश, जीवे ठार‎मारण्याचा प्रयत्न, जबरी चोरी अशा‎गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गोकुळ‎राठोडला पोलिसांनी तातडीने अटक‎करायला हवी होती. पण त्याला ताकीद‎देऊन सोडून दिल्याचे सायंकाळी ठाणे‎अंमलदाराने ‘दिव्य मराठी’ला सांगितले.‎रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास‎पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बबन‎आव्हाड यांना त्या संदर्भात विचारले‎तेव्हा, ‘याची आपल्याला माहिती नाही.‎माहिती घेऊन सांगतो’ असे उत्तर त्यांनी‎दिले. त्यानंतर त्यांनी वारंवार फोन‎करूनही प्रतिसाद दिला नाही. आरोपी‎गोकुळ राठोडला मेमो देऊन सोडून दिले,‎असे ठाणे अंमलदार सांगत असले तरी‎त्याला ‘मेमो’ हा वैद्यकीय तपासणीसाठी‎दिला गेला होता आणि तिथे गेल्यानंतर तो‎आरोपी पसार झाला, अशी माहिती‎सुत्रांकडून देण्यात आली आहे. आरोपी‎पसार झाला ही बातमी झाली तर संबंधित‎कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल, या भीतीने‎ती माहिती दडवण्यात येत असल्याचा‎संशय त्यामुळे बळावला आहे.‎

गुन्ह्याचे कलम अजामिनपात्र‎

पोलिसांनी आरोपी गोकुळ राठोडवर भारतीय‎न्याय संहितेच्या कलम ११८(१) नुसार गुन्हा‎नोंदवला. धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी‎स्वेच्छेने दुखापत करणे असा त्याचा अर्थ आहे.‎या कलमाखाली गुन्हा सिद्ध झाल्यास तीन‎वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा वीस हजार रुपयांपर्यंत‎दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे हे‎कलम अजामिनपात्र आहे. तरीही मेमो देऊन‎सोडून दिले, असे पोलिस ठाण्यातून सांगितले‎जाणे म्हणूनच संशयास्पद आहे. दरम्यान,‎पोलिसांनी ११८(३) हे कलम लावणे आवश्यक‎होते, असे तज्ज्ञांनी सांगितले. त्या कलमान्वये‎आजीवन कारावास किंवा दहा वर्षांपर्यंत‎तुरुंगवासाची शिक्षा आणि दंडाची शिक्षा होऊ‎शकते, असे अॅड. केतन ढाके यांनी सांगितले.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp