
Nilesh Ghaiwal Case Update: पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ सध्या फरार आहे. निलेश घायवळ प्रकरणात आत्तापर्यंत अनेक धक्कादायक ट्विस्ट समोर आले आहेत. त्यातच आता निलेश घायवळची रीट पिटीशन समोर आली आहे. या रीट पिटीशनवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सुनावणी सुरू होणार आहे.
पुण्यातील कोथरुड गोळीबारानंतर निलेश घायवळच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. कोथरुड गोळीबाराचा आणि निलेश घायवळचा काहीएक संबंध नसल्याचा दावा रिट पिटिशनमध्ये करण्यात आला आहे. घायवळ कुठली ही टोळी चालवत नसल्याचं रीट पीटिशन मध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
निलेश घायवळच्या रीट पीटिशनमध्ये नेमकं काय म्हटलंय?
निलेश घायवळ कोणतीही टोळी चालवत नसल्याचा रीट पिटिशनमध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसंच, मिडिया ट्रायलवर पुणे पोलिसांनी कोथरुड गोळीबारात नाव घेतल्याचं या याचिकेत म्हटलं गेलं आहे. 9 तारखेला निलेश परदेशात गेला होता.गोळीबार 17 तारखेला झाला. त्यामुळं घायवळचा कुठलाही संबंध नाही असं याचिकेत म्हटलं आहे.
पुणे पोलिसांनी केवळ त्रास देण्यासाठी बनावट गुन्हा रचला गेला आहे. चुकीच्या पद्धतीने घायवळ याला टोळी प्रमुख म्हणून दाखवण्यात आलं.कुटुंबियांना पोलिसांनी धमकावलं आणि सर्च वॉरंट नसताना पोलिसांनी घरात घुसून झडती घेतल्याचा आरोप रीट पिटीशनमध्ये केला आहे.
निलेश घायवळच्या म्हणण्याप्रमाणे मारेकरी आणि निलेश घायवळ गँगचे आत्ता जे तथाकथित मारेकरी आहेत, जे पकडले गेलेले, त्या लोकांची आणि निलेशची कुठल्याही प्रकारे ओळख नाही त्यांची गाठभेट नाही. त्यांनी कधी एकमेकांना फोनवर सुद्धा बोललेले नाहीत, असं असताना देखील त्याचं नाव या प्रकरणांमध्ये गोवण्यात आलं ही गोष्ट त्यांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलेली आहे.
FAQ
प्रश्न 1: निलेश घायवळ सध्या कुठे आहे आणि प्रकरणाचा सद्यस्थिती काय?
उत्तर: निलेश घायवळ सध्या फरार आहे. पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जाणारा घायवळ या प्रकरणात अटक झालेला नाही. रिट पिटीशनद्वारे हे प्रकरण कोर्टात चॅलेंज करण्यात आले असून, आजच्या सुनावणीनंतर पुढील दिशा ठरेल.
प्रश्न 2: या प्रकरणात आत्तापर्यंत कोणते धक्कादायक ट्विस्ट समोर आले आहेत?
उत्तर: कोथरूड गोळीबारानंतर घायवळच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत कुटुंबावर अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, मारेकरी आणि घायवळ गँग यांच्यात कोणताही संबंध नसल्याचा दावा कोर्टात मांडण्यात आला आहे.
प्रश्न 3: या सुनावणीनंतर काय होऊ शकते?
उत्तर: मुंबई उच्च न्यायालयाची सुनावणी घायवळच्या बाजूने किंवा विरोधात जाऊ शकते. याचिकेत पोलिसांच्या कारवाईला आव्हान दिले असल्याने, कोर्ट गुन्हा रद्द करण्याबाबत किंवा तपासाच्या सूचना देऊ शकते. अद्याप निकालाची अपेक्षा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.