digital products downloads

जिकलंस भावा! GST अन् इतर सवलतींमुळं कोल्हापूरात विक्रमी वाहन नोंदणी, खरेदीत पठ्ठे एकदम पुढं….

जिकलंस भावा! GST अन् इतर सवलतींमुळं कोल्हापूरात विक्रमी वाहन नोंदणी, खरेदीत पठ्ठे एकदम पुढं….

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : (Auto news record break Vehicle ragistration Kolhaur) केंद्र सरकारकडून सणासुदीच्या तोंडावर जीएसटी कपात (GST Cut) करण्यात आल्यानंतर राज्यामध्ये (Vehicle Purchase) वाहन खरेदीला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर दुचाकी आणि चार चाकीच्या नोंदणीमध्ये तब्बल तीन पटींनी वाढ झाली होती. आता दिवाळीच्या तोंडावरही देखील मागील वर्षीच्या तुलनेच दुचाकी आणि चार चाकी वाहन नोंदणीमध्ये तिपटीने वाढ झाल्याचं आकडेवारी सांगत आहे. 

Add Zee News as a Preferred Source

दिवाळी आणि त्यात जीएसटी रकमेत झालेल्या कपातीचा परिणाम म्हणून राज्यभरामध्ये दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दसऱ्यानंतर दिवाळीच्या तोंडावर सरासरी दुचाकीच्या विक्रीमध्ये 50 टक्क्यांनी, तर चार चाकीच्या विक्रीमध्ये 30 ते 40 टक्क्यांची वाढ झाली. सध्या कोल्हापूर शहरातल्या सर्व वाहनांच्या शोरूममध्ये  बुकिंग साठी तोबा गर्दी होत आहे. 

नुकताच घटस्थापना ते दसरा या कालावधीत नवीन वाहन नोंदणी कशाप्रकारे झाली आहे यावर एक नजर टाकूया. 

मागील वर्षी 3 ऑक्टोबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 या कालावधीत 

MCY Vehicle – 1215
Motor car – 400

22 सप्टेंबर 25 ते 02 ऑक्टोबर  2025

MCY Vehicle- 2961
Motor car – 1325

दसरा, दिवाळी, गुढी पाडवा असो वा कोणताही शुभ मुहूर्त  कोल्हापूरकर नेहमीच महागड्या वस्तूंच्या  खरेदीला प्राधान्य देतात ही जणू कित्येक वर्षाची कोल्हापूरकरांची परंपराच झाली आहे. त्यात जीएसटीमध्ये भरमसाट सूट मिळाल्यानंतर कोल्हापूरकर कसं बरं ही संधी सोडतील? यावेळी पठ्ठे खरेदीमध्ये मागे पडतील असं होणारच नाही. बर, पण खरेदी करणाऱ्यांचा उत्साह शिगेला असला तरीही बुकिंग च्या तुलनेत वाहनं उपलब्ध होतील की नाही अशी शंका आता शोरूम चालक व्यक्त करत आहेत. 

ते काही असो, केंद्र सरकारने केलेल्या जीएसटी कपातीमुळे  अनेक क्षेत्रांमध्ये उलाढाल वाढल्याचं बाजारपेठेमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे.. कोल्हापूरसह राज्यभरातील वाहन बाजारही त्याला अपवाद राहिलेला नाही ज्यामध्ये कोल्हापुराचं खास योगदान…. नाही का?

FAQ

कोल्हापूरमध्ये वाहन नोंदणीत वाढ कशामुळे झाली?
केंद्र सरकारने सणासुदीच्या तोंडावर जीएसटी कपात केल्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाली. मागील वर्षीच्या तुलनेत दसरा आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नोंदणी तिप्पट वाढली.

दसरा कालावधीत नोंदणीची आकडेवारी काय आहे?
मागील वर्षी (3 ऑक्टोबर 2024 ते 12 डिसेंबर 2024): दुचाकी (MCY) – 1215, चारचाकी (मोटर कार) – 400.
यंदा (22 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025): दुचाकी – 2961, चारचाकी – 1325.

कोल्हापूरकरांची खरेदीची परंपरा काय आहे?
कोल्हापूरकर नेहमीच दसरा, दिवाळी, गुढी पाडवा यांसारख्या शुभ मुहूर्तावर महागड्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतात. जीएसटी कपातीमुळे ही संधी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, त्यामुळे शोरूममध्ये बुकिंगसाठी तोबा गर्दी झाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp