
सागर आव्हाड (प्रतिनिधी) नाशिक : शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी नाशिक (Nashik) पोलिसांनी ऑपरेशन क्लिन अप सुरु केलंय. गुंडांची धिंड काढल्याचे अनेक रिल्सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांवर कौतुकाचा वर्षावरही होतोय. मात्र नाशिक पोलिसांचं हे क्लिन अप ऑपरेशन खरोखर यशस्वी ठरतंय का असा सवाल उपस्थीत होतोय आणि त्याला कारण ठरलीये सातपूरची लोंढे गँग.
नाशिक पोलिसांच्या ताब्यात असलेला प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे हे सातपूरच्या लोंढे टोळीचे हे मास्टरमाइंड असून सातपूरमध्ये या गँगची मोठी दहशत आहे. नाशिकमधली गुंडगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात क्लीनअप ऑपरेशन सुरु केलंय. त्यात या दोघांच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात. त्यांची दहशत मोडून काढण्यासाठी यूपी पॅटर्न प्रमाणे त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझरही चालवण्यात आला.
या कारवाईमुळे लोंढे टोळीची दहशत कायमची संपेल असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र पोलिसांचा हा अंदाज खोटा ठरलाय. कारण चंद्रकांत विश्वकर्मा नावाच्या तरुणावर याच टोळीतील काही गुंडांनी कोयत्यानं जिवघेणा हल्ला केला आहे. इतकच नाही तर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न केलाय. या हल्ल्यात चंद्रकांत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे लोंढे टोळीचे दोन्ही मास्टरमाईंड प्रकाश आणि दिपक लोंढे हे दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. असं असतानाही त्यांच्या टोळीनं तरुणावर हल्ला करुन एक प्रकारे पोलिसांना ओपन चॅलेंजच दिलंयं. त्यामुळे नाशिक पोलिसांचं ऑपरेशन क्लीन अप फेल होतंय की काय अशी चर्चा शहरात रंगू लागलीये.
FAQ :
नाशिक पोलिसांचे ऑपरेशन क्लीन अप म्हणजे काय आणि त्याचा उद्देश काय आहे?
नाशिक पोलिसांनी शहरातील गुंडगिरी संपवण्यासाठी ‘ऑपरेशन क्लीन अप’ सुरू केले आहे. या मोहिमेचा उद्देश गुंडांच्या धिंड काढणे, त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवणे (यूपी पॅटर्नप्रमाणे) आणि शहरात दहशत मोकळी न सोडणे हा आहे. या कारवाईचे अनेक रील्स सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पोलिसांवर कौतुक होत आहे.
लोंढे गँग कोण आहे आणि सातपूरमध्ये त्यांची दहशत कशी आहे?
सातपूर येथील लोंढे गँग ही नाशिकमधील एक मोठी गुंड टोळी आहे, ज्याची सातपूर भागात मोठी दहशत आहे. या गँगचे मास्टरमाइंड प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे हे आहेत. ते गुंडगिरीच्या विविध घटनांसाठी ओळखले जातात आणि शहरातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांच्या रडारवर आहेत.
प्रकाश आणि दीपक लोंढे यांच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली?
ऑपरेशन क्लीन अप अंतर्गत नाशिक पोलिसांनी प्रकाश लोंढे आणि दीपक लोंढे या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून दहशत मोडून काढण्याचा प्रयत्न केला गेला. पोलिसांचा अंदाज होता की यामुळे लोंढे टोळीची दहशत कायमची संपेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.