
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांसाठी मोठी घोषणा करत तब्बल 47 अधिकाऱ्यांना पदोन्नतीची ‘दिवाळी भेट’ दिली आहे. गेल्या 10 वर्षांपासून रखडलेल्या बढत्यांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे महाराष्ट्राला आता 47 नवे अपर जिल्हाधिकारी मिळा
.
अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) पदावर बढती
सामान्य प्रशासन विभागाने 15 ऑक्टोबर रोजी दिलेल्या इतिवृत्तानुसार, आस्थापना मंडळ (क्रमांक 2) ने अपर जिल्हाधिकारी संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांची निवडसूची वर्ष 2025-26 साठी तयार केली. त्यानुसार, अपर जिल्हाधिकारी (गट-अ) (वेतनश्रेणी एस 25-1 78,800- 2,09,200/-) संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) (गट-अ) (वेतनश्रेणी एस 27-11,23,100-2,15,900/-) या संवर्गात तात्पुरत्या स्वरूपात नियमित पदोन्नती देण्याची शिफारस करण्यात आली होती.
30 दिवसांत रुजू व्हा: शासनाचे निर्देश
या पदोन्नत अधिकाऱ्यांनी 30 दिवसांच्या आत नवीन पदावर रुजू होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम 1981 नुसार, जर अधिकारी 30 दिवसांत रुजू झाले नाहीत, तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 नुसार शिस्तभंग विषयक कारवाई होऊ शकते, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रुजू झाल्याचा अहवाल तातडीने revenue@maharashtra.gov.in या ईमेलद्वारे शासनाला कळवावा लागणार आहे.
महसूलमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद
पारदर्शकतेवर भरपदोन्नतीची घोषणा करण्यापूर्वी, महसूलमंत्री बावनकुळे यांनी आज मंत्रालयातील दालनातून राज्यातील सुमारे एक हजार सहाशेहून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यामध्ये सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार, तसेच नोंदणी, मुद्रांक आणि भूमी अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी बोलताना बावनकुळे यांनी महसूल विभागाचे महत्त्व अधोरेखित केले. महसूल विभाग हा जनतेच्या आशा, आकांक्षांना मूर्तरूप देणारा आणि सामान्य जनतेशी थेट संबंध येणारा महत्त्वाचा घटक आहे. हा विभाग अधिक जनताभिमुख, पारदर्शी आणि कार्यक्षम व्हावा, असे आवाहन करत त्यांनी दीपपर्वाच्या निमित्ताने या कार्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.