
Mallojula Venugopalrao Surrender: तब्बल सहा कोटींचे बक्षीस असलेला मल्लोजुला राव उर्फ भूपती याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करल्याने नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. भूपतीबरोबरच 50 हून अधिक नक्षलवादी शरण आले. यादरम्यान पोलीस आणि सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण करणाऱ्या मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपतीला माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने माओवादी संघटनेतून बडतर्फ केलं आहे. त्या संदर्भातला एक पत्रक केंद्रीय समितीच्या प्रवक्त्याने जारी केलं आहे.
भूपती नंतर दुसऱ्याच दिवशी छत्तीसगडमध्ये 200 माओवाद्यांसोबत आत्मसमर्पण करणाऱ्या सतीशला सुद्धा संघटनेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर भूपती आणि सतीश सोबत आत्मसमर्पण करणाऱ्या जवळपास 271 माओवाद्यांना सुद्धा संघटनेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.
भूपती आणि सतीश दोघेही गद्दार आहेत. त्यांनी पोलिसांशी हातमिळवणी केल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. तसंच आम्हाला भूपतीवर 2011 पासूनच संशय होता. त्याचे पोलिसांशी संबंध होते असा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे. पोलीस आणि सुरक्षा दला विरोधातला आमचा सशस्त्र संघर्ष सुरूच राहील असेही केंद्रीय समितीने या पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलं आहे.
आत्मसमर्पण करणारे भूपती आणि सतीशसारखे माओवादी नेते संधीसाधू आणि स्वार्थी होते. त्यांनी माओवाद्यांच्या अनेक दशकांच्या लढ्याशी गद्दारी केली. दोघांनी त्यांच्या समर्थकांसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आणि माओवाद्यांचे महत्त्वाचे शस्त्र सुद्धा पोलिसांच्या स्वाधीन केलं. दोघांना योग्य वेळी योग्य शिक्षा दिली जाईल असा इशाराही या पत्रकात देण्यात आला आहे..
भूपती आणि सतीशला कोणत्याही स्थितीत माफ केलं जाणार नाही. मात्र त्यांच्यासोबत आत्मसमर्पण करायला गेलेले इतर नक्षली जर भविष्यात माओवाद्यांच्या संघटनेत परत येऊ इच्छित असले, तर त्यांना आम्ही परत घेऊ असंही या पत्रकात सांगण्यात आलं आहे.
हातात संविधान घेऊन शरण
भूपतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असतील तर शरणागती पत्करु, अशी अट घातली होती. त्यामुळे ऐनवेळी सोलापूरचा विमानप्रवास टाळून मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा गडचिरोलीकडे वळवला होता. देवेंद्र फडणवीस स्वत: उपस्थित असतानाच भूपती शरण आला. फडणवीसांनी स्वत: उपस्थित राहून भूपतीची इच्छा पूर्ण केली. विशेष म्हणजे भूपतीसोबत शरण आलेल्या त्याच्या अनेक साथीदारांनी हाती संविधानाची प्रत घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्कारली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरण आलेल्या नक्षल्यांच्या हाती संविधानाची प्रत सोपवली. भूपतीकलाही मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत सोपवली. भूतपीकडे संविधानाची प्रत सोपवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भूपतीची पत्नी तारक्काला मंचावर बोलावून तिचाही सत्कार केला. ती याच वर्षी 1 जानेवारीला नक्षलवाद सोडून शरण आली होती. तिच्या प्रयत्नानेच भूपती शरण आल्याचं सांगितलं जात आहे.
भूपती 40 वर्षांपासून नक्षल चळवळीत
मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती गेल्या 40 वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. नक्षल चळवळीत केंद्रीय समिती पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटीमध्ये सदस्य होता. अनेक हिंसक हल्ल्यांचा तो सूत्रधार आहे. नक्षली चळवळीच्या थिंकटँकमध्ये भूपती आहे. भूपती अनेक वर्षापासून नक्षल चळवळीची भूमिका आणि धोरणे ‘अभय’ या नावाने पत्रकातून मांडत होता.
FAQ
1) मल्लोजुला राव उर्फ भूपती कोण आहे आणि त्याने काय केले?
उत्तर: मल्लोजुला वेणुगोपालराव उर्फ सोनू उर्फ भूपती हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. तो माओवादी संघटनेच्या केंद्रीय समिती आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य होता. अनेक हिंसक हल्ल्यांचा सूत्रधार असलेला भूपती नक्षल चळवळीच्या थिंकटँकमध्ये होता आणि ‘अभय’ या नावाने पत्रके जारी करत असे. त्याच्यावर ६ कोटींचे बक्षीस होते. त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शरणागती पत्करली, ज्यामुळे नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला. भूपतीसोबत ५० हून अधिक नक्षलवादी शरण आले.
2) भूपतीच्या शरणागतीचे स्वरूप कसे होते?
उत्तर: भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी अट घातली होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहतील. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सोलापूरचा विमानप्रवास सोडून गडचिरोलीकडे जाऊन भूपतीची इच्छा पूर्ण केली. शरणागतीदरम्यान भूपती आणि त्याच्या साथीदारांनी हाती संविधानाची प्रत घेऊन पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मुख्यमंत्र्यांनी भूपतीला आणि इतर शरणागत नक्षलवादींना संविधानाची प्रत सोपवली. भूपतीची पत्नी तारक्का (जी याच वर्षी १ जानेवारीला शरण आली होती) यांचाही सत्कार करण्यात आला. तिच्या प्रयत्नानेच भूपती शरण आल्याचे सांगितले जाते.
3) माओवादी संघटनेने भूपतीवर काय कारवाई केली?
उत्तर: माओवादी केंद्रीय समितीने भूपतीला संघटनेबाहेर काढले (बडतर्फ केले). एका पत्रकात केंद्रीय समितीच्या प्रवक्त्याने हे जाहीर केले. भूपतीवर २०११ पासून संशय होता आणि त्याचे पोलिसांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला. भूपतीला ‘गद्दार’ म्हटले असून, पोलिसांशी हातमिळवणी केल्याबद्दल दोषी धरले गेले. संघटनेने असा इशारा दिला की भूपती आणि त्याच्यासारख्या नेत्यांना योग्य वेळी शिक्षा दिली जाईल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.