
Pune Koregaon Land Purchase: पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातील तब्बल 40 एकर जमीन सरकारी नियम वाकवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरु झालाय. झी 24 तासने यासंदर्भातील बातमी समोर आणलीय. पार्थ अजित पवार यांची कंपनी या जमीन खरेदीची ग्राहक होती. पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले पुत्र आहेत. त्यांच्या कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील हे पार्थ यांचे मामेभाऊ असून, ते माजी मंत्री राणा जगजितसिंहांचे चुलतभाऊ आहेत. ही ४० एकर मोक्याच्या ठिकाणी असलेली जमीन सरकारी असल्याचा आरोप आहे. या प्रकरणारवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी, मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विविध नेत्यांनी यांनी काय प्रतिक्रिया दिली? जाणून घेऊया.
काय म्हणाले सचिन सावंत?
सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहावे लागणार. मुख्यमंत्री हे क्लिनचिट मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. ते काय बोलतात हे पाहावे लागेल. या प्रकरणात गरीबांची लूट झालीय हे स्पष्ट दिसतय. यावर कारवाई झाली पाहीजे असे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. सत्तेचा आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. अशा गोष्टी पुढे येऊ दिल्या जात नाहीत. तुम्ही निर्भिडपणे हा विषय मांडताय, असेही ते म्हणाले.
विषय शेवटपर्यंत नेऊ-सुषमा अंधारे
पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊ. आम्ही भूमिका घेऊ तेव्हा सळो की पळो करुन सोडू. पुण्यामध्ये असा प्रकार कोणीही सहन करणार नाही. उबाठा शेवटपर्यंत हा विषय नेऊ. गरज पडली तर ज्या चिरंजीवांनी हे केलंय त्यांच्या पिताश्रींचा राजीनामा घेण्यापर्यंत आम्ही पाऊल उचलू, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.
उदय सामंत काय म्हणाले?
हे प्रकरण मला माहिती नाही. मी उद्योगमंत्री झाल्यानंतर कोणताही गैरप्रकार झाला नाही. नियमबाह्य होण्याची शक्यता कमी आहे. व्यवस्थित माहिती घेऊन मी खुलासा करेन असे उदय सामंत म्हणाले. खासगी जागेंवरदेखील प्रकल्प उभे राहतात. कोणती जमिन आहे त्याची मी माहिती घेतोय. मी आता अधिकाऱ्यांशी बोललो. याचा एमआयडीशी संबंध नाही. त्यांना शासनाशी जमिन कोणी दिली? हे पाहावं लागेल. स्टॅम ड्युटीशी याचा संबंध आहे का? हे मला तपासावं लागेल. पार्थ पवार हे उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत. या प्रकरणाची माहिती घेतल्याशिवाय बोलणे उचित ठरणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
मुळामध्ये हे प्रकरण झी 24 तासवर सुरु आहे. याची वस्तुस्थिती मला अद्याप माहिती नाही. यात कोणी दोषी असेल तर अजित पवार समर्थ आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना बदनाम करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिली.
विजय वडेट्टीवारांकडून चौकशीची मागणी
या जमिनीच्या संदर्भात पॉवर ऑफ अटर्निटी लीगल कारवाईसाठी दिला. सेलसाठी दिला नाही. कांबळे आणि ढोले यांच्यानावे सातबारा झाला होता. ही जमिन घेत नसताना ज्यांना कुठलाही अधिकार नव्हता. ही जमिन शासनाची असेल तर महसूल विभागाची परवानगी लागते. महसूल विभागाकडे कार्यवाही झाली नाही. माझ्या माहितीप्रमाणे ती जमिन सरकारी आहे.महसूल विभागाने कोणता निर्णय घेतला नाही. सरकारी जमिन ताब्यात घेऊन कायद्याची पायमल्ली करुन जमिनीची विल्हेवाट लावण्यात आलीय. खाणाऱ्यांना आम्ही वाचवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहीजे. याची पारदर्शी चौकशी झाली पाहीजे. जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे मी ऐकले आहे. जो दोषी असेल तो सुटता कामा नये. पाहीलं तर 1 लाख कोटींचा घोटाळा समोर येईल. या व्यवहाराची चौकशी करुन हा व्यवहार रद्द व्हावा, अशी आमची मागणी आहे. हा घोटाळा झी 24 तासने उघड केला, याबद्दल झी 24 तासचे आभार मानत असल्याचे वडेट्टीवार म्हणाल. त्या माणसाला जमिन विक्रीचा अधिकार नाही, हे मी जबाबदारीने सांगतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून याची चौकशी झाली पाहीजे. माझ्याकडे अशी 2-3 प्रकरणे आहेत. आमचा पक्ष ही मागणी लावून धरणार आहे.
FAQ
१. कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यावर सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया काय?
सुषमा अंधारे यांनी सांगितले की, पक्ष म्हणून आम्ही भूमिका घेऊ आणि हा विषय शेवटपर्यंत लढू. पुण्यात असा प्रकार कोणीही सहन करणार नाही. गरज पडली तर चिरंजीवांनी (पार्थ पवार) हे केले असल्यास त्यांच्या पिताश्री (अजित पवार) यांचा राजीनामा घेण्यापर्यंत आम्ही थांबणार नाही.
२. उदय सामंत यांनी प्रकरणाबाबत काय म्हटले?
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले की, हे प्रकरण मला अद्याप माहिती नाही. मी उद्योगमंत्री झाल्यानंतर कोणताही गैरप्रकार झाला नाही. नियमबाह्य होण्याची शक्यता कमी आहे. मी माहिती घेऊन एक तासात खुलासा करेन. खासगी जमिनीवरही प्रकल्प उभे राहतात, त्याची मी तपासणी करतोय.
३. अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले की, हे प्रकरण झी २४ तासवर सुरू आहे आणि त्याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. यात कोणी दोषी असेल तर अजित पवार समर्थ आहेत. निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना बदनाम करण्याचा डाव आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



