
Eknath Khadse: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन आयटी पार्कसाठी खरेदी करताना मुद्रांक शुल्कात कोट्यवधी रुपयांची माफी घेतली आणि नियमबाह्य फायदे घेतले, असा आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टिका होत आहे. अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, काल संध्याकाळी झी 24 तासवर ही बातमी पाहिली. हे प्रकरण गंभीर आहे. ही जमिन महारवतनाची असून त्यासाठी महसूल आयोगाकडून परवानगी घ्यावी लागते. ती घेतलेली नाही. तसंच, ज्यांचे भांडवलच 1 लाख आहे त्यांनी 300 कोटी कुठून आणले. जर बेकायदेशीर व्यवहार झाला असेल तर जमिन मुळ मालकाला परत दिली जातात. मात्र यात कोणतीही बेकायदेशीर व्यवहार झाल्यानंतर मुळ मालकाला परत जातात मात्र यात कोणतीही कारवाई अजून झालेली दिसत नाहीये. मला वाटतं याची चौकशी व्हायला हवी, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
हजार कोटींची जमीन असेल 24 तासांच्या आत स्टॅम्प ड्युटी माफ करणे हे कोणाचा वरदहस्त असल्याशिवाय इतक्या वेगाने या गोष्टी होणं शक्य नाही. चौकशी होईल. 70 हजार कोंटीच्या घोटाळ्यातून अजित पवार मुक्त झाले तसे हे देखील होईल.त्यामुळं याची चौकशी ही सरकारच्या माध्यमातून न करता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून झाली तर जनतेला विश्वास बसेल. यात त्यांचा मुलगा असल्यामुळं जोपर्यंत नैतिक जबाबादारी स्वीकारुन अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे.
FAQ
१. पार्थ पवार यांच्यावर नेमका कोणता आरोप आहे?
उत्तर: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ‘महार वतन’ जमीन आयटी पार्कसाठी खरेदी करताना पार्थ पवार यांनी मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कोट्यवधी रुपयांची माफी घेतली आणि नियमबाह्य फायदे घेतले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
२. हे प्रकरण गंभीर का मानले जात आहे, असे एकनाथ खडसे यांचे मत आहे?
उत्तर: खडसे यांच्या मते, ही जमीन ‘महार वतन’ प्रकारची आहे. अशा जमिनीच्या व्यवहारासाठी महसूल आयोगाकडून परवानगी घेणे आवश्यक असते, जी या प्रकरणात घेतलेली नाही. तसेच, ज्या कंपनीचे भांडवल केवळ ₹१ लाख आहे, तिने ₹३०० कोटी कुठून आणले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
३. एकनाथ खडसे यांनी या व्यवहारावर आणखी कोणते आक्षेप घेतले आहेत?
उत्तर: हजारो कोटींची जमीन असेल, तरी २४ तासांच्या आत स्टॅम्प ड्युटी माफ करणे हे कोणाचा तरी ‘वरदहस्त’ (आशीर्वाद/ पाठिंबा) असल्याशिवाय शक्य नाही.बेकायदेशीर व्यवहार झाल्यास जमीन मूळ मालकाला परत केली जाते, परंतु या प्रकरणात अजून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



