
मुंबई येथे रेल्वे कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर केलेल्या आंदोलनामुळे सायंकाळच्या वेळी रेल्वे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. जीआरपीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात निषेध म्हणून कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी
.
संध्याकाळच्या ‘पीक आवर’मध्ये लोकलसेवा थांबल्याने हजारो प्रवासी स्थानकांवर खोळंबले होते. सायंकाळी 6:40 मिनिटांनी लोकलची वाहतूक पुन्हा सुरू झाली असली तरी, या आंदोलनामुळे लोकल सध्या 40 ते 45 मिनिटे उशिराने धावत आहेत. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
आंदोलनाचे कारण काय?
मुंब्रा येथे झालेल्या एका अपघाताप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन अभियंत्यांवर गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचारी संघटनांनी आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तीव्र आंदोलन केले. या आंदोलनात एनआरयूएम संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी मोर्चा काढला. तसेच, मोटरमन देखील आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली. लोकल थांबल्याने सीएसएमटी स्थानकावर अनेक लोकल उभ्या होत्या आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
संध्याकाळच्या ‘पीक आवर’मध्ये झालेल्या या आंदोलनामुळे लोकल वाहतूक पावणेसहा वाजेपर्यंत थांबली होती. रेल्वे प्रशासनाने तातडीने रेल्वे युनियनसोबत बोलणी सुरू केली. लोकल सेवा त्वरित पूर्ववत व्हावी, यासाठी डीआरएम आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांसोबत यशस्वी बोलणी झाल्यानंतर सुमारे पावणेसात वाजता लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली.
जीआरपीने अभियंत्यांविरोधात दाखल केलेल्या केसच्या विरोधात हे आंदोलन होते. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन थांबवण्यात आले आहे. तथापि, पावणेसहा ते पावणेसात या वेळेत लोकल सेवा ठप्प असल्याने, सध्या मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा उशिराने सुरू राहील, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी दिली आहे.
मुंब्रा अपघात प्रकरण काय होते?
9 जून रोजी मुंब्रा स्थानकाजवळ झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता, तर नऊ जण जखमी झाले होते. लोहमार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, या लोकल अपघाताचे मुख्य कारण हे रेल्वे अभियंत्यांचे दुर्लक्ष होते. अपघाताच्या ठिकाणी पावसाळ्यामुळे जमीन खचली होती, परंतु रेल्वे अभियंत्यांनी या भागाचे दुरुस्तीचे काम वेळेत केले नाही आणि त्याकडे दुर्लक्ष केले. या दुर्लक्षामुळेच अपघात घडल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते. या प्रकरणी रेल्वेचे सीनिअर सेक्शन इंजिनिअर समर यादव आणि असिस्टंट डिव्हिजनल इंजिनिअर विशाल डोळस या दोन अभियंत्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



