
Pune Koregaon Park Land Deal Parth Pawar: झी 24 तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीची विक्री करणा-या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर जमीन गैरव्यवहार प्रकराणात सर्वात मोठा खुलासा झाला आहे. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांचे 99 टक्के तर दिग्वीजय फक्त 1 टक्का भागिदार आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपल्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून कोरेगाव पार्क येथे 40 एकर जमिनीचा व्यवहार झाला आहे. 300 कोटींच्या व्यवहारासाठी अवघ्या 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आल्याच्या गोंधळाबरोबरच इतरही अनेक आक्षेप घेतले जात आहे. या प्रकरणात पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. झी 24 तासने बुधवारी रात्रीपासून ही बातमी लावून धरली होती. त्यानंतर काल सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर तातडीने तपासाची सूत्रे हलली आणि कारवाई सुरू झाला. रात्री मुद्रांक विभागाच्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमेडिया जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झालेले दिग्विजय पाटील हे पुण्यातील रोहन गरिमा सोसायटीत राहतायत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्वीजय पाटील यांच्यावर काय कारवाई होणार हा प्रश्न विचारला जातोय . विशेष म्हणजे अमेडा कंपनीत पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. तर, दिग्वीजय फक्त एक टक्का भागीदार आहेत . मात्र पार्थ यांच्या ऐवजी दिग्वीजय यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क जमिनीचा जेवढा मोठा स्कॅम आहे तितकाच मोठा FIR चाही स्कॅम असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. अमेडिया एन्टरप्रायझेस कंपनीत पार्थ पवार यांची भागिदारी 99 टक्के आहे, तर दिग्विजय पाटील यांची भागिदारी अवघी 1 टक्का इतकीच आहे. मात्र अजित पवार यांचे पुत्र असल्यामुळे पार्थ पवार यांच्यावर FIR दाखल झाला नसल्याचा आरोप दमानियांनी केला.
FAQ
1 कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण काय आहे?
झी २४ तासने समोर आणलेल्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणात ४० एकर जमिनीचा ३०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. या व्यवहारासाठी अवघ्या ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी घेण्यात आली, ज्यामुळे गोंधळ आणि इतर आक्षेप घेण्यात आले आहेत. मुद्रांक शुल्क विभागाच्या तक्रारीनंतर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2 या प्रकरणी कोणत्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे?
या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे: जमिनीची विक्री करणाऱ्या शीतल तेजवानी, अमेडिया कंपनीतील पार्थ पवार यांचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारु.
3 पार्थ पवार यांची या प्रकरणातील भूमिका काय आहे?
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी त्यांच्या अमेडिया कंपनीच्या माध्यमातून हा जमीन व्यवहार केला आहे. अमेडिया कंपनीत पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे, तर दिग्विजय पाटील यांची फक्त १ टक्का भागीदारी आहे. मात्र, पार्थ पवार यांच्या विरोधात कुठलीही तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर दिग्विजय पाटील यांच्यावर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



