
Today Weather Update: नोव्हेंबर महिन्याच्या आगमनासोबतच देशभरात थंडीने हळूहळू जोर पकडायला सुरुवात केली आहे. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस हवेत गारवा वाढला आहे. तर उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये थंडी एकदम चढू लागली असून तापमानामध्ये लक्षणीय घट नोंदवली जात आहे. दरम्यान, काही राज्यांमध्ये पावसाचा अलर्ट अजूनही कायम असल्याने हवामानातील बदलांचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर दिसून येत आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात वाढती थंडी
राजधानी दिल्लीमध्ये आता हिवाळ्याने ठोस पाऊल टाकले आहे. पुढील आठवडाभर राजधानीत किमान तापमान साधारण 11 ते 13 अंश सेल्सियसच्या आसपास राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सकाळ-संध्याकाळ चालणाऱ्या थंड वाऱ्यामुळे गारठा अधिक जाणवू लागला आहे.
यासोबतच दिल्ली-एनसीआरमध्ये हवा गुणवत्तेची स्थिती पुन्हा खालावू लागली आहे. नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्राम परिसरात AQI धोक्याच्या झोनमध्ये नोंदवला जात आहे. कोसळत्या तापमानामुळे प्रदूषणाचा प्रभाव आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
उंच भागांमध्ये बर्फबामुळे वाढला गारठा
पश्चिम विक्षोभ सक्रिय झाल्याने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील उंच भागांमध्ये पुन्हा बर्फबारी सुरू झाली आहे. 4000 फूटांपेक्षा जास्त उंचीवरील भागांमध्ये बर्फाचे थर जमू लागले आहेत. यामुळे या राज्यांमध्ये रात्रौचे तापमान जलद गतीने खाली येत आहे. अनेक ठिकाणी तापमान 10 अंशाखाली पोहोचले आहे, तर काही बर्फाच्छादित भागांत तापमान शून्याखाली घसरलेले आहे.
महाराष्ट्रातील आजचे हवामान (Today Weather in Maharashtra)
आज महाराष्ट्रात हवामान कोरडे ते अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे सकाळ-सायंकाळ हलकी थंडी जाणवेल. नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ या भागांत किमान तापमान 14-17 अंश सेल्सियस दरम्यान राहील. पुणे, नाशिक आणि अहमदनगर मध्ये सकाळी धुक्याचे वातावरण आणि हवेत गारवा राहील. पुण्यात तापमान 15-18 अंश सेल्सियस नोंदवले जाऊ शकते. मुंबई व कोकणात दिवसाचं तापमान नेहमीप्रमाणे थोडं वाढलेलं असेल, परंतु रात्री समुद्री वाऱ्यामुळे थोडा गारवा जाणवेल. मुंबईचे तापमान 20-32 अंश सेल्सियस दरम्यान राहील.
कोल्हापूर, सातारा, सांगली भागांत हवामान कोरडे आणि स्थिर, रात्री हलकी थंडी, दिवस उबदार राहण्याची शक्यता. महाराष्ट्रात पावसाचा धोका नाही, मात्र काही भागांत सकाळी धुके आणि वाऱ्यात गारवा जाणवेल.
‘या’ चार राज्यांमध्ये पावसाचा इशारा
जरी देशात पावसाळा मागे सरला असला, तरी तामिळनाडू, केरळ, पुडुचेरी आणि मेघालय या राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसू शकतो. येथे मुसळधार पावसासोबत जोरदार वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. समुद्र किनाऱ्याजवळील भागांमध्ये मच्छीमारांना सावध राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
एकूणच, देशात थंडीचे आगमन आता स्पष्टपणे जाणवत आहे, काही राज्यांमध्ये पावसाचे सावट कायम असून पुढील काही दिवस हवामान आणखी बदलत्या स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



