
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी युसीआय (युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल) मानकांनुसार सुरक्षात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे ५० देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने त्य
.
जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आणि परिवहन विभागासोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, पोलीस उप अधीक्षक दिलीप शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आणि पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक उपस्थित होते.
स्पर्धेदरम्यान गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा पासेस, सायकलपटूंची वाहतूक, ट्रॅकवरील सुविधा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि त्यांचे प्रशिक्षण यावर प्रामुख्याने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरी तसेच ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थिती, गर्दी आणि परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरही भर देण्यास सांगितले. पोलीस अधिकारी आणि सायकल संघटनांमध्ये योग्य समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण रस्त्याची लांबी सुरक्षादृष्ट्या तपासणी करावी. या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि त्यानंतर नियोजनात कोणताही बदल करू नये, असे डुडी म्हणाले. विशेषतः ग्रामीण मार्गावर प्राणी येणार नाहीत याची दक्षता घेण्यासही त्यांनी सांगितले.
शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत स्पर्धा होणार असल्याने पोलिसांचे एकच पथक कॉन्व्हॉयसोबत असावे. खेळाडूंच्या आगमनापासून ते प्रयाणापर्यंत ग्रीन कॉरिडोर तयार करावा आणि सुरक्षा पासेस देण्याबाबतही नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले की, स्पर्धेवेळी मुख्य मार्गावर वाहतूक नियोजन आणि गर्दीचे व्यवस्थापन ही मोठी जबाबदारी आहे. यासाठी परिसरातील नागरिकांची जनजागृती करणे आवश्यक आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असेही पाटील म्हणाले.पुणे ग्रँड चॅलेंज टूरचे तांत्रिक संचालक पिनाकी बायसक यांनी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या मार्गाची तपासणी, गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व प्रशिक्षण याबद्दल माहिती दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावर या स्पर्धेचे महत्त्व, सहभागी खेळाडूंद्वारे होणारे सुरक्षेचे मूल्यांकन आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळताना घ्यावयाची काळजी यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत करण्यात येणाऱ्या सुरक्षात्मक उपाययोजना, पोलीस विभाग आणि सायकल संघटनांमधील समन्वय यावर बायसक यांनी भर दिला. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन हे आपल्या देशाची प्रतिमा उंचावणारे असल्याने संपूर्ण स्पर्धेदरम्यान चोख पोलीस सुरक्षा पुरवण्यासह गर्दी व वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे, असेही बायसक यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



