digital products downloads

शिंदेसेनेच्या नेत्याने पाणीपुरी विक्रेत्याला विकला फुटपाथ: तीन लाखांत केला सौदा, घेतलेली जागा मनपाची असल्याचे समजल्याने विक्रेता पडला चाट – Mumbai News

शिंदेसेनेच्या नेत्याने पाणीपुरी विक्रेत्याला विकला फुटपाथ:  तीन लाखांत केला सौदा, घेतलेली जागा मनपाची असल्याचे समजल्याने विक्रेता पडला चाट – Mumbai News


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला मुंबईतील फुटपाथ विकल्याची घटना समोर आली आहे. हा ३ लाख रुपयांचा व्यवहार २ वर्षांपूर्वी पार पडला. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या

.

यासंबंधीच्या माहितीनुसार, मुलुंड येथे फुटपाथवर पाणीपुरी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या संतोष गुप्ता यांना मनपाचा फुटपाथ विकत घेतला आहे. त्यांनी आपण हा फुटपाथ शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी अविनाश बागूल यांच्याकडून विकत घेतल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते, अविनाश बागूल यांनी २०२३ मध्ये फुटपाथचा एक भाग आपल्याला ३ लाखांत विकला. ही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून बागूल यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली. ही रक्कम त्यांनी कर्ज व आपल्या आईचे दागिने गहाण ठेवून जमवली. या जागेमुळे आपले नशीब पालटेल अशी त्यांना आशा होती. पण झाले ते भलतेच. संतोष गुप्ता मागील २ वर्षांपासून या व्यवहाराचे दस्तऐवज तयार करण्यासाठी अविनाश बागूल यांच्या मागे लागला होता. पण ते टाळाटाळ करत होते. अखेर कंटाळून गुप्ता यांनी आपले पैसे परत मागितले. पण त्यांना ना ही जागा मिळाली ना दिलेले पैसे मिळाले. त्यानंतर आता त्यांना ज्या जागेसाठी आपण हा व्यवहार केला ती मुंबई महापालिकेची संपत्ती असल्याचे समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि हा घोटाळा उजेडात आला. याप्रकरणी अजून तरी शिंदेसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

३ चेक दिले, पण सर्व बाउन्स झाले

संतोष गुप्ता यांनी अविनाश बागूल यांच्याकडे आपल्या पैशांची विचारणा केली, तेव्हा त्यांनी एक जुना चेक दिला. पण तो बाउन्स झाला. त्यानंतर त्यांनी आणखी २ चेक दिले. पण तेही बाउन्स झाले. संतोष गुप्ता यांनी बागूल यांच्यावर एका डोसेवाल्याकडून दरमहा १७ हजार रुपयांची वसुली करण्याचाही आरोप केला आहे. गुप्ता यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर बागूल यांनी त्यांना दीड लाखांचा चेक दिला. पण त्यांनी ज्या बँकेचा चेक दिला त्यात तेवढी रक्कमच शिल्लक नव्हती. त्यामुळे तो चेक वटला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी गुप्ता यांना कोर्टातून आदेश आणण्यास सांगितले आहे.

बागुलांनी फेटाळले गुप्ता यांचे आरोप

अविनाश बागूल यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. संतोष गुप्ता व माझ्यात कोणताही करार झाला नव्हता. त्याने माझ्याकडून व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. ते मी त्याला परत केले. माझ्यावरील आरोप राजकीय कटाचा भाग आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे यावरून वाद पेटला आहे.

फुटपाथवर ठिकठिकाणी अतिक्रमण

मुंबई महानगरपालिकेने लागू केलेल्या सुधारित पदपथ धोरणाचा मुख्य उद्देश पादचाऱ्यांसाठी फुटपाथ पूर्णपणे अतिक्रमणमुक्त करणे हा आहे. या धोरणांतर्गत, फेरीवाले आणि इतर अडथळे दूर करून, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना रस्त्यावर न उतरता चालण्यासाठी सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध केला जातो. पदपथांवरील सुविधा आणि पायाभूत संरचना) सुधारून, हे धोरण मुंबईतील पादचारी वाहतूक सुरक्षित आणि सुलभ बनवण्यावर लक्ष केंद्रित करते. मात्र, मुंबई आणि अनेक उपनगरात फुटपाथवर अतिक्रमणे झाल्याचे दिसून येत असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp