
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना वाघ यांनी, जर समोर असता तर उभा
.
यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, कुठल्या शब्दाने सांत्वन करू, तीन-साडेतीन वर्षाच्या निरागस मुलीवर राक्षसी प्रकार झाला. या घटनेमुळे प्रत्येक आईचे काळीज रडत असेल, अत्याचार करुन राक्षसी पद्धतीने तिची हत्या करण्यात आली. मी एक आई, एक महिला आणि या राज्याची मुलगी म्हणून सांगते कायद्यात तरतूद राहिली असती तर त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता.
मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे
प्रचंड जनप्रक्षोभ आहे, या हरामखोराला फाशी व्हायला हवी. घटना घडल्याच्या दिवसापासून मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. एकही छोट्यातल्या छोटा पुरावा सुटता कामा नये, या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहोत. यांना ठेचून काढणे ही काळाची गरज आहे. अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी, मरेपर्यंत फाशी व्हायला पाहिजे. पालक म्हणून आपणही जागरूक राहणे आवश्यक आहे. त्याला फाशीच होणार, हा देवा भाऊंच्यावतीने मी शब्द देते, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
तसेच चांगल्या वकिलाकडे ही केस द्यावी यासाठी मी उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून जे काही याच्यात करता येईल ते सगळे प्रशासन, पोलिस करत आहेत. लवकरच चार्जशीट दाखल केली जाईल, असेही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.
खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या अमानुष कृत्याचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत असून, आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा व्हावी आणि खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर, आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे येथे येऊन पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून हा खटला जलदगतीने न्यायालयात चालविण्यात येईल, असे आश्वासन चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबीयांना दिले. कुटुंबीयांनी वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करीत हंबरडा फोडताच, घरातील विदारक परिस्थिती पाहून चित्रा वाघ यांनाही अश्रू अनावर झाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



