
- Marathi News
- National
- Inspirational Award To Bhaskar Family Members Who Live Rameshji’s Values; Dai. Bhaskar Group Remembers Its Inspiration Rameshji
दिव्य मराठी नेटवर्क | भोपाळ23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन आणि प्रणेते रमेशचंद्र अग्रवाल यांची ८१ वी जयंती रविवारी “प्रेरणा उत्सव” म्हणून साजरी करण्यात आली. भास्कर समूहाचे प्रेरणास्थान श्री. रमेशचंद्र अग्रवाल यांचा संपूर्ण प्रवास भावनिकदृष्ट्या खोलवर रुजलेल्या मूल्यांनी परिपूर्ण होता. प्रत्येक आव्हानावर मात करण्याची त्यांची दृढता, त्यांचे परिश्रम आणि सर्वांना सहजतेने सोबत घेण्याची त्यांची क्षमता यामुळे समूह यशस्वी झाला. संपूर्ण भास्कर कुटुंब त्यांच्या दृष्टिकोनाचा आणि मूल्यांचा वारसा स्वीकारत पुढे जात आहे.
रमेशजींच्या जीवनमूल्यांचे आपल्या कामात आणि वागण्यात सहजतेने अनुकरण करत उदाहरण निर्माण करणाऱ्या समूहातील सहकाऱ्यांचा प्रेरणा पुरस्कार २०२५ देऊन गाैरव करण्यात आला. समूहातील सहकाऱ्यांना सहा श्रेणींमध्ये नामांकन देण्यात आले. या श्रेणी पुढीलप्रमाणे. पीपल कनेक्ट आणि ग्राउंड कनेक्ट, नम्रता आणि इमोशनल कनेक्ट, अॅनालिटिकल, व्यवसाय वाढ आणि रिझल्ट ओरिएंटेशन, साधेपणा आणि ट्रेंडसेटर. विजेत्या भास्कराइट्सना भास्कर समूहाचे एमडी सुधीर अग्रवाल आणि संचालक गिरीश अग्रवाल यांनी सन्मानित केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



