
एकाच वेळी दीडशे नागरिक मिरवणुकीने प्रभाग क्रमांक दोनच्या म्हाडा कॉलनी येथील मतदान केंद्रावर आल्याने नगरसेवक पदाच्या दोन उमेदवारांत शाब्दिक चकमक झाली.
.
एका पक्षाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवाराने सांगितले की, गेली पंधरा वर्षे मी व ‘ती’ व्यक्ती एकाच पक्षाकडून नगरसेवक राहिलेलो आहोत. इंदिरानगर झोपडपट्टीतील मतदारांना आमिष दाखवून व धाक दाखवून ते एकत्र मतदानासाठी घेऊन येतात. यावेळी ते दुसऱ्या पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढवत आहेत. याही वेळी इंदिरानगर येथील दीडशे नागरिकांना घेऊन ते म्हाडा कॉलनी येथील मतदान केंद्रावर मंगळवारी (दि. २) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास आले होते. यावेळी मी मतदारांना तुम्ही अशा भूलथापांना, आमिषाला बळी पडू नका, अन्यथा तुमचे घर नावावर होऊ देणार नाही, असे बोललो, पण या संवादाचा काही भाग कापून “तुमचे घर नावावर होऊ देणार नाही,’ एवढ्याच वाक्याचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.
टीम दिव्य मराठी | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६ नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी दिवसभर चुरशीचे मतदान झाले. वैजापूरसह काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत रांगा लावून मतदारांनी मतदान केले. तर, पैठणला काही वेळ १० ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या. वेळीच या मशिन बदलण्यात आल्या. याचा फारसा काही मतदानावर परिणाम झाला नाही. पैठणला दुपारी तीन वाजेपर्यंत ५४ टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यानंतर अनेक भागांतील मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी किरकोळ वाद झाले. १० ईव्हीएमचे बटण अचानक बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा आला. मात्र, तांत्रिक पथकांनी मशीन तातडीने दुरुस्त करून मतदान पुन्हा सुरू केले, अशी माहिती तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली. ४४ बूथपैकी प्रभाग ८ मधील बूथ क्रमांक ४ वरील मशीन अर्धा तास बंद राहिली. प्रभाग ११, २, ३ आणि ९ मधील मशीनही बंद पडली. त्यामुळे काही ठिकाणी मतदार नाराज झाले. तणाव वाढू नये म्हणून पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र, रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. पंचायत समितीमधील बूथ क्रमांक २ येथे उमेदवारांच्या नेत्यांमध्ये किरकोळ वाद झाला. पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून नेत्यांना मतदान केंद्राबाहेर काढले. नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवार आणि नगरसेवकपदासाठी १०१ उमेदवार रिंगणात होते. नगरसेवकपदासाठी एकूण ११५ उमेदवार उभे होते. मात्र, चार प्रभागांतील निवडणूक २० डिसेंबरला होणार असल्याने आज १०१ उमेदवारांसाठी मतदान झाले.
प्रतिनिधी | वैजापूर नगर परिषदेच्या बारा प्रभागांतील २३ जागा व नगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी साडेसात ते साडेतीन वाजेपर्यंत अकरा हजार ३०२ पुरुष व अकरा हजार ७३८ स्त्री अशा सुमारे २३ हजार ४० मतदारांनी म्हणजेच ५४. ४२ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेनंतरही मतदान सुरु होते. शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील दोन्ही बूथवर रात्री ८ पर्यंत मतदान सुरू होते. साधारणपणे ७३.३० टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र सुरुवातीचे दोन तास वगळता दिवसभर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यामुळे बहुतेक सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या. बाजार समिती येथील मतदान केंद्र, दर्गा बेस, मौलाना आझाद शाळा, लोकमान्य टिळक शाळा आदींसह अनेक मतदान केंद्र गर्दीने फुलले होते.
वैजापुरात २१ हजार ३४३ पुरुष व २० हजार ९९१ महिला असे ४२ हजार ३३४ मतदार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या तीन व नगरसेवक पदासाठी ७३ अशा ७६ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या शिवाय इतरही ठिकाणी निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या सर्वच उमेदवारांचा भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. गंगापुरात मतदान केंद्र क्र. २/३ वर सकाळी ९.१५ ते ९.३० दरम्यान ईव्हीएम मशीन बंद पडले होते. ते बदलून दुसरे बसवल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले. याशिवाय काही मतदान केंद्रांवर ईव्हीएमचे बटन दबत नसल्याने मतदानास अडचणी येत असल्याच्या तक्रारी काही मतदारांनी केल्या होत्या. आता भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. नेमका निकाल कुणाच्या बाजून लागतो, याकडे मतदारांसह उमेदवारांचे लक्ष लागले आहे. दिवसभर मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळेस अनेक ठिकाणी मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



