
CM Fadnavis Raut Meeting: आजरपणामुळे प्रकाशझोतापासून दूर असलेले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपूर्वी बऱ्याच काळानंतर प्रसारमाध्यमांसमोर आले. यानंतर आता ज्या मुख्यमंत्र्यांवर ते सातत्याने टीका करत असतात त्याच देवेंद्र फडणवीसांसोबतचा एक फोटो सध्या समोर आला असून हा फोटो एका खासगी लग्न सोहळ्यातील आहे.
भेटीसंदर्भात कोणती माहिती समोर आली?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या या फोटोमध्ये फडणवीस आणि राऊत बाजूबाजूला बसलेले दिसत आहेत. खाजगी विवाह सोहळ्यात दोन्ही नेत्यांची ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये केवळ औपचारिक भेट आणि गप्पा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं असून फडणवीसांनी राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.
फडणवीसांनी राऊतांना काय सांगितलं?
मिळालेल्या माहितीनुसार, ही भेट मंगळवारी एका लग्न सोहळ्यात झाली. दोन्ही नेत्यांमध्ये 10 मिनीटे दोघांमध्ये चर्चा, मुख्यमंत्र्यांनी राऊतांच्या तब्येतीची विचारपुस केली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वडिलांच्या आजारपणाच्या अनुभवावरुन राऊतांना मार्गदर्शनही केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फडणवीसांनी आजरपणासंदर्भात राऊतांना काही मोलाचे सल्ले दिल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा आपल्याला फोन येऊन गेला होता अशी माहितीही दिली होती. या भेटीच्या निमित्ताने तो कॉलही आता चर्चेत आहे.
राज आज राऊतांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी सकाळी वाजता दादर शिवतीर्थ येथून भांडुपकडे जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं.
राऊतांना झालंय काय?
राऊत यांना ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्या होत्या. 31 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितले की, त्यांची तब्येत अचानक बिघडली असून, ते उपचार घेत आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोन महिने सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांपासून दूर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं
5 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या पांढऱ्या रक्तपेशींची संख्या (WBC count) कमी झाली होती, ज्यामुळे तात्काळ उपचार घेणे आवश्यक होते. रुग्णालयात असताना त्यांनी हाताला सलाईन लावलेल्या फोटोसह “लिहित राहिले पाहिजे…” अशी कॅप्शन देत एक पोस्ट केली होती.
35 आमदार फोडणार असल्याचा दावा
1 डिसेंबर रोजी त्यांनी अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाबाबत टीका केली, ज्यात ते म्हणाले की, भाजप शिंदे गटातील 35 आमदार फोडणार आहे. उद्धव ठाकरेंनीही सांगितले की, राऊत लवकरच मैदानात परततील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



