
Devendra Fadanvis On Nashik Tapovan: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाने तपोवनातील शेकडो वृक्ष तोडण्यात येणार आहेत. तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करत विविध संघटनांसह अनेक राजकीय पक्षही पुढे सरसारवले आहेत. अनेक पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीचा विरोध करत आंदोलन पुकारलं आहे. या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस काय म्हणाले?
मुंबईत आज ऑरेंज गेट टनेलच्या कामासाठी टनेल बोअरिंग मशीच्या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांना तपोवनातील वृक्षतोडीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. ‘पर्यावरणही महत्त्वाचं आहे झाडंही महत्त्वाचं आहे. माझं, एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा आमच्यापैकी कोणचंही असं मत नाही की अशाप्रकारची झाडं तोडली गेली पाहिजेत. पण प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथे 15 हजार हेक्टर जागा आहे. पण आपला कुंभमेळा ज्या साधुग्राममध्ये होतो. तिथे 350 हेक्टर जागा आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.’
‘ही जी काही झाडं आहेत. आपण जर 2015-16 चा गुगलमॅप बघितला तर यातल कोणतंच झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम घेतला. त्या काळात नाशिक महानगरपालिकेने विचार करुन ती झाडे लावली. कारण ती जागा रिकामी होती. 12 वर्षांत आपण एकदाच ती वापरतो. आता ज्या वेळी तिथे साधुग्रामचा विचार झाला तिथे साधुग्राम करता येत नाही. कारण तिथे वृक्षांची दाटी तिथे निर्माण झाली आहे.’ असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘आता यासंदर्भात मार्ग काढून कमीत कमी झाडं कशी कापता येतील किंवा कापूच नयेत. जी काही थोडीबहुत पुर्नलागवड करता येतील ती करावीत. अशा सगळ्या गोष्टींचा विचार चालला आहे.’
‘काही लोकांनी अॅक्टीव्हिजम सुरु केलंय. काही लोक राजकीय कारणांसाठी पर्यावरणवादी बनलेत. काही लोकांना कुंभमेळ्यात अडथळे यावेत असं वाटतं, ही काहींची इच्छा मात्र आम्ही ती पूर्ण होऊ देणार नाही,’ अशी टीका विरोधकांवर यावेळी फडणवीसांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



