
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर लाखोंच्या संख्येने अनुयायी येत असतानाच, मुंबई महापालिकेने समुद्रातील मोठ्या भरतीचा इशारा दिला आहे. येत्या 4 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत अरबी समुद्रात साडेचार ते प
.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनी समुद्राला मोठी भरती असणार आहे. 6 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजून 39 मिनिटांनी समुद्रात तब्बल 5.03 मीटर उंचीच्या लाटा उसळतील. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चौपाटीवर अनुयायांची मोठी गर्दी असते. अनेकजण अभिवादनानंतर समुद्रकिनाऱ्यावर जातात. मात्र, या काळात समुद्राचे रूप रौद्र असल्याने नागरिकांनी पाण्याच्या जवळ जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
पुढील तीन दिवस समुद्रात मोठ्या लाटा उसळणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव महापालिका आणि मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. नागरिकांनी आणि अनुयायांनी समुद्रात खोलवर जाऊ नये, तसेच किनाऱ्यावर तैनात असलेले पोलीस आणि जीवरक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश महापालिका प्रशासनाने दिले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे कळविण्यात आलेला मोठ्या भरतींचा तपशिल खालीलप्रमाणे
- गुरुवार, दि. 4 – 12 – 2025 – रात्री – 11:52 वा.- लाटांची उंची – 4.96
- शुक्रवार, दि. 5 – 12 – 2025 सकाळी – 11:30 वा.- लाटांची उंची – 4.14 मीटर
- शनिवार, दि. 6 – 12 – 2025 -मध्यरात्री – 12.39 वा.-लाटांची उंची – 5.03 मीटर
- शनिवार, दि. 6 – 12 – 2025 -दुपारी – 12.20 वा.- लाटांची उंची – 4.17 मीटर
- रविवार, दि. 7 – 12 – 2025 -मध्यरात्री –1.27 वा. लाटांची उंची – 5.01 मीटर
- रविवार, दि. 7- 12 – 2025 -दुपारी – 1.10 वा. लाटांची उंची – 4.15 मीटर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



