
सत्ताधारी महायुतीने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएम घोटाळा करण्यासाठीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी लांबवल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजप आपल्या 175 जागा येणार असल्याची गोष्ट आतापासूनच लोकां
.
विजय वडेट्टीवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सरकारची अधिवेशनाला सामोरे जाण्याची इच्छा दिसत नाही. सरकार घाबरलेल्या मनस्थितीत आहे. त्याचे कारण असे आहे की, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत वाढ झाली आहे. महिलांवरील अत्याचारांत वाढलेत. जमीन बळकावण्याचे मोठमोठे घोटाळे सुरू आहेत. गुंडांची दादागिरी वाढली. सत्ताधारी पक्षांचे आमदार लोकांना कापण्याची, मारण्याची, उडवून देण्याची भाषा करत आहेत. राज्यात एकप्रकारे धमकावण्याचे सत्र सुरू आहे. त्यातच राज्याती आर्थिक स्थिती पाहता सरकारची हे अधिवेशन पूर्णवेळ चालवण्याची इच्छा दिसत नाही. या सरकारला नागपूर कराराशी काहीही देणेघेणे नाही. कोणतेही सोयरेसूतक नाही.
नागपुरात अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्या
ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षात होते, तेव्हा ते प्रखरपणे विदर्भाच्या संदर्भात भूमिका मांडत होते. मला एवढेच सांगायचे आहे की, तुम्हाला नागपुरात अधिवेशन घ्यायचे असेल तर अर्थसंकल्पीय अधिवेशन घ्या. या अधिवेशनात तुम्ही काही देऊ शकणार नाही. जनतेलाही काही मिळणार नाही. उगीच तोंडाला पाने पुसण्यासाठी कशाला अधिवेशन घ्यायचे? बजेट अधिवेशन घ्या. त्यातून तुम्ही विदर्भाला काय देणार हे तुम्हाला मांडता येईल. आता आचारसंहितेचे कारण देऊन तुम्ही काही देणारही नाही आणि घोषणाही करणार नाही. त्यामुळे विदर्भात अधिवेशन घेऊन वेळ का घालवता? 5-6 दिवसांच्या अधिवेशनासाठी सर्व यंत्रणांना कामाला जुंपून काहीही निष्पन्न होणार नाही.
सरकारने हिवाळी अधिवेशन नागपुरात घेण्याऐवजी अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले असते तर अधिक चांगले झाले असते. वैदर्भीय लोकांना न्याय मिळाला असता. अधिवेशन किमान 2 आठवडे चालवण्यास सरकारला अडचण काय आहे. किमान 10 दिवस तरी चालवा. अधिवेशन काळात आमच्या बिझनेस अॅडव्हायझरी कमिटीची बैठक होईल. त्यात आम्ही तो विषय मांडू, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
महायुतीवर ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सत्ताधारी महायुतीवर ईव्हीएमचा घोटाळा करण्यासाठी मतमोजणी लांबवण्याचाही आरोप केला. ते म्हणाले, सरकारने निकालाची 20 दिवस वाट पाहण्याची पाळी का आणली? त्यांच्यात भाजप 268 पैकी 175 जागा निवडून येतील हे सांगण्याचा आत्मविश्वास कुठून आला? कोणत्या आधारावर भाजपचे लोक असे म्हणतात? सरकारने असे कोणते दिवे लावले की, ते असा दावा करत आहेत? आज तिन्ही पक्षांत प्रचंड मारामाऱ्या सुरू आहेत. ते एकमेकांविरोधात उभे टाकलेत. एकमेकांचे कपडे उतरवत आहेत. त्यांनी एकमेकांची नामुष्की केली.
नाचक्की झाली. लोकं तमाशा पाहत आहेत. त्यात आमच्या 175 जागा येतील असे दावे करणे हे ईव्हीएम घोटाळा करण्याचे संकेत आहेत. ते आतापासूनच लोकांच्या मनात आमच्या एवढ्या जागा येणार हे बिंबवत आहेत. यामुळे ते ईव्हीएमशी छेडछाड करण्यास मोकळे होतील. यांनी ईव्हीएमचा वापर करून निवडणुका जिंकल्यात. हे लोक लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकत आहेत. बिहारमध्येही असेच झाले. त्यामुळे निवडणुकीत भाजपच्या 170-175 जागा आल्या, तर यांनी बेईमानी करून, ईव्हीएममध्ये गडबड करून, ईव्हीएम हॅकिंग करून यांनी निवडणुका जिंकल्या हे स्पष्ट होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.
एकेका मताला प्रत्येकी 20 हजार रुपये
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगत आहेत की, आम्ही एकेका मताला प्रत्येकी 20 हजार रुपये दिले. प्रचंड पैशांचा महापूर आला. कामठीत हा प्रकार सर्वांनी पाहिला. उमेदवारांच्या फार्महाऊसमध्ये झालेली घटना. तिथ्य कोट्यवधी रुपये मिळालेत. तरी कारवाई नाही. तुमच्याकडे जनतेचा पाठिंबा आहे, तर तुम्ही मतदानासाठी एवढ्या पैशांचा वापर केला? याचा अर्थ तुम्हाला मते मिळत नाहीत. म्हणून तुम्ही ही मतमोजणी 20 दिवस लांबणीवर टाकली.
राज्य सरकारच्या वकिलांनी कोर्टात या प्रकरणी का भूमिका मांडली नाही. त्यांना ईव्हीएममध्ये गडबड करायची आहे, निकाल फिरवायचे आहेत. यासाठीच त्यांनी कोर्टात बाजू मांडली नाही. यासाठीच त्यांनी 20 दिवसांचा कालावधी घेतला हे स्पष्ट आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



