
Sheetal Tejwani Pune Land Scam : झी २४ तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहारप्रकरणी शीतल तेजवानीची पुण्यातील कोर्टात सुनावणी झाली आहे. तपास अधिका-यांनी 13 पानी डिमांड कॉपी कोर्टात सादर केली. तर महसूल विभागाचा 5 पानी रिपोर्ट आणि जबाबही कोर्टात सादर करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान तेजवानीच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. FIRमधील एकही कलम तेजवानीला लागू होत नसल्याचा युक्तिवाद तिच्या वकिलांनी कोर्टात केला.
सरकारी अधिका-यांना सोडून तेजवानीला अटक का करण्यात आली असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर सरकारी वकिलांनी तेजवानीच्या वकिलांचा सर्व युक्तिवाद खोडून काढला. यावेळी तपास अधिका-यांनीही बाजू मांडली. आरोपी शीतल तेजवानीनं सरकारची 40 एकर जमीन परस्पर विकली आहे. त्यामुळे अधिकचा तपास करायचा आहे. त्याकरता तेजवानीला अटक केल्याचं तपास अधिका-यांनी सांगितलं. तसच तिच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची विनंती त्यांनी कोर्टाला केली. दरम्यान अटक होऊनही तेजवानीचा तोरा कायम असल्याचं पाहायला मिळालं.
शितल तेजवानी ला जास्तीत जास्त दिवसांची कोठडी द्यावी असी मागणी पुणे पोलिसांची न्यायालयाकडे केली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, शितल तेजवानी याच या शासकीय जमीन घोटाळ्याच्या मास्टरमांईड असल्याचे तपासात समोर आल्यानेच आम्ही तिला अटक केली. मुंढवा इथं शासकीय जमीन आहे ती बॉटनिकल सर्वे ला लीज वर दिली. ती जागा वतनदारांना रिग्रँट झाल्याचा कोणताही आदेश नव्हता तरीही आरोपी ने त्यांची कुलमुख्त्यार पञ घेऊन ही जागा परस्पर विक्री केलीय हा प्रमुख आरोप आहे तेजवानी वर आहे.
2006 साली वतनदारांची कुलमुख्त्यार पञ घेऊन 2013 मधे या आरोपी ने महसूल मंञ्यांकडे रिग्रँट साठी अपील केलं पण ते फेटाळलं गेलं मग त्या हायकोर्टात गेल्या तिकडेही रिग्रँटसाठी चे अपील फेटाळले गेले तरीही या आरोपी ने रिग्रांटचे खोटे शासकीय ग्राऊंड तयार करण्यासाठी एक पञ देऊन 11 हजारांचा डीडी भरला पण तो डीडी कोणत्याही शासकीय बँक खात्यात जमा झालेला नाही. पुणे पोलिसांकडून रिमांड रिपोर्ट सादर करण्यात आला.
पुणे पोलिसांच्या रिमांड मधील काही महत्वाचे मुद्दे
– कुललमुखत्यारपत्र तयार करण्यासाठी लागणारे कागदपत्रांची तपासणी करायची आहे
– शासकीय नियमांचे उल्लंघन आणि मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे तपासात निष्पन्न
– मुंढवा जमीन प्रकरणात तेजवानी कुललमुखत्यारधारक होत्या त्या अनुषंगाने तपास बाकी
– शासनाची जमीन असून सुद्धा275 वतनदारांना आणि जागा मालकांपैकी काही जणांना चेक दिले असल्याने त्याबाबतीचा आर्थिक व्यवहार तपासणे आहे
– अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांनी तेजवानीकडून शेतजमीन नावावर असलेल्या व्यक्तींचे कुलमुख्यातरपत्र तयार करुन घेतले या बाबतीत सुद्धा अनेक कागदपत्रांची चौकशी करणे
– संबंधित जमिनीची जुनी कागदपत्रे, बंद सातबारा उतारे, त्यावर बदलत गेलेल्या नोंदी याबाबत देखील चौकशी करणे
– आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाल्याचा पोलिसांना संशय असल्याचे त्या अनुषंगाने तपास करायचा आहे
– संबंधित व्यक्तींकडून पॉवर ऑफ ॲटर्नी करून घेताना मोबदला दिला का, कशाच्या आधारावर पॉवर ऑफ ॲटर्नी केली, अमेडिया कंपनीबरोबर व्यवहार कशा पद्धतीने झाला, या अनुषंगाने ही तेजवानीकडे चौकशी करणे बाकी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



