digital products downloads

अमरावतीमध्ये चारित्र्यावर संशय घेवून‎ पतीने केला पत्नीचा खून: अचलपूर तालुक्यातील खैरी येथील घटना‎ – Amravati News

अमरावतीमध्ये चारित्र्यावर संशय घेवून‎ पतीने केला पत्नीचा खून:  अचलपूर तालुक्यातील खैरी येथील घटना‎ – Amravati News


चारित्र्यावर संशय घेत पतीने‎ पत्नीचा खून केल्याची धक्कादायक ‎‎घटना अचलपूर तालुक्यातील खैरी‎ येथे गुरूवारी (दि. 4) उघडकीस ‎‎आली. या प्रकरणी पसार होण्याच्या ‎‎तयारीत असलेल्या आरोपी पतीला ‎‎आसेगाव पोलिसांनी अटक केली ‎आहे.‎

.

जानराव उर्फ ज्ञान्या भोसले ‎(35, रा. खैरी) असे अटक‎ करण्यात आलेल्या आरोपीचे नाव‎ असून, त्याची पत्नी सबाना जानराव‎ भोसले (वय 32) हिचा त्याने खून ‎केला आहे. पती जानराव हा‎ पत्नीच्या चारित्र्यावर सातत्याने ‎संशय घेत तिच्याशी वारंवार भांडणे ‎करत होता. भांडण थांबवण्यास‎ गेलेल्या वस्तीतल्या नागरिकांनाही तो ‎शिवीगाळ व मारहाण करत‎ असल्याने कोणतीही व्यक्ती त्यांच्या ‎भांडणात हस्तक्षेप करण्यास‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ धजावत नव्हते, असे स्थानिकांनी‎ सांगितले. याशिवाय, जानरावने‎ सासू सासऱ्यांनाही मारहाण करून ‎त्यांना घराबाहेर काढून दिले होते. ‎परिणामी त्यांच्यावर अत्यंत‎ हालअपेष्टा सहन करण्याची वेळ‎ आली होती. मृत दांपत्यास दोन ‎लहान मुले आहेत. घटनेची माहिती ‎मिळताच पोलिसांनी तातडीने ‎घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन व‎फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करून ‎पुरावे संकलित केले.‎

बांबूने चेहऱ्यावर घाव‎

3 डिसेंबरला रात्री अंदाजे 10 ते 12 ‎वाजण्याच्या दरम्यान जानरावचे ‎पत्नीसोबत कडाक्याचे भांडण‎ झाले. यावेळी त्याने बांबूने पत्नीच्या ‎चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर,‎मांडीवर व पोटरीवर जबर मारहाण‎ केली. या मारहाणीत सबाना भोसले‎या गंभीर जखमी झाल्या आणि‎ त्यातच त्यांचा मृत्यू झाला.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp