
MP Amol Kolhe On Indigo: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) वैमानिक व केबिन क्रू साठी नवे फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL) नियम 1 नोव्हेंबरपासून कठोरपणे लागू केले. यात क्रूना जास्त विश्रांती, कमी सलग ड्युटी आणि रात्रपाळीच्या वेळा कमी करण्यावर भर आहे. परिणामी इंडिगो सारख्या मोठ्या कंपनीत अचानक कर्मचारी-कमतरता निर्माण झाली आणि गेल्या तीन दिवसांत देशभरात 550 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. खासदार अमोल कोल्हे यांनाही याचा फटका बसलाय. काय घडलाय नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
गुरुवारी सर्वाधिक फटका
दिल्लीत 172, मुंबईत 118, बंगळुरूत 100, हैदराबादमध्ये 75, कोलकात्यात 35, चेन्नईत 26 अशी एकूण दहा हून अधिक विमानतळांवर इंडिगोची शेकडो उड्डाणे रद्द झाली. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 1232 उड्डाणे रद्द झाली, त्यापैकी 755 फक्त नव्या FDTL नियमांमुळे रद्द झाली.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग ३ तासांनी फ्लाईट कॅन्सल..!
सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं.
३ तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला… pic.twitter.com/0zIbTtqdeO
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 4, 2025
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही फ्लाइट प्रथम दोन तास उशिराने, नंतर थेट रद्द झाली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल..!सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..!, असे अमोल कोल्हे म्हणाले.
विमान कंपन्यांची DGCA कडे विनंती
DGCA ने गुरुवारी सर्व प्रमुख विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कंपन्यांनी नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्याची विनंती केली आणि पूर्णपणे नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा अवधी मागितला.
इंडिगोला DGCA चे कठोर निर्देश
DGCA ने इंडिगोला नवीन क्रू भरती योजना, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुन्हरचना, सुरक्षा धोरण आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली असून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. प्रवाशांची सुरक्षितता आणि क्रूची विश्रांती वाढवण्यासाठी आणलेले नियम सध्या विमान कंपन्यां आणि प्रवाशांसाठी डोके दुखी ठरताना दिसत आहेत.
FAQ
प्रश्न १. DGCA चे नवे FDTL नियम नेमके काय आहेत आणि ते का लागू केले?
उत्तर: DGCA ने वैमानिक आणि केबिन क्रू साठी नवे Flight Duty Time Limitation (FDTL) नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून कठोरपणे लागू केले आहेत. यात क्रूना जास्त विश्रांती देणे, सलग ड्युटीची वेळ कमी करणे आणि विशेषतः रात्रपाळीच्या (नाइट ड्युटी) वेळा कमी करण्यावर भर आहे. हे नियम क्रूच्या थकव्या कमी करून प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणले आहेत.
प्रश्न २. नव्या नियमांमुळे इंडिगोची किती उड्डाणे रद्द झाली?
उत्तर: नव्या FDTL नियमांमुळे इंडिगोला अचानक क्रूची कमतरता भासली. गेल्या तीन दिवसांत ५५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली, तर नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत एकूण १,२३२ उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यापैकी ७५५ उड्डाणे फक्त नव्या नियमांमुळेच रद्द झाली.
प्रश्न ३. DGCA ने इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांना काय आदेश किंवा सूचना दिल्या?
उत्तर: DGCA ने इंडिगोला नवीन पायलट-केबिन क्रू भरती योजना, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुन्हर्रचना, सुरक्षा धोरण तयार करून दर १५ दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे कठोर निर्देश दिले. तसेच सर्व प्रमुख विमान कंपन्यांची बैठक घेऊन कंपन्यांनी मागितलेली तात्पुरती शिथिलता नाकारली असून पूर्ण अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यासही नकार दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



