
Chandrapur Election Result 2026 : चंद्रपूर महापालिकेत एकूण 17 प्रभागातून 66 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. पण इथे प्रभाग प्रभाग क्रमांक 1 (दे. गो. तुकुम) मध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. या प्रभागातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने वर्चस्व राखत चारपैकी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
एबी फॉर्म वाटपात घोळ करणाऱ्या शहर भाजपध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेले सुभाष कासनगोट्टूवार यांचा विजय आहे. सुभाष हे चंद्रपूरचे स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचे खंदे समर्थक आहेत. निवडणूक काळात सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर अनेक आरोप झालेत. एबी फॉर्मच्या वाटपात मनमानी, गोंधळ आणि गैरप्रकार केल्याचे आरोप कासनगोट्टूवार यांच्यावर झाले होते. याची गंभीर दखल घेऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट पत्र काढत त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती.
या कागदपत्रांवर खोटे शिक्के मारून नागरिकांना फसवले गेले आणि मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप झाला. जनतेची दिशाभूल करून मतदानावर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुभाष कासनगोट्टूवा झाल्यानंतरही ते निवडणुकीत जिंकून आले आहेत.
दुसरीकडे चंद्रपुरातील प्रभाग 5 मध्ये काँग्रेसच्या सुनंदा धोबे यांनी भाजपच्या माजी महापौर अंजली घोटेकर यांचा पराभव केला. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे.
याआधी भाजपच्या माजी महापौर राखी कंचर्लावार , माजी उपमहापौर अनिल फुलझेले, संदीप आवारी यांचाही पराभव झालाय.
दरम्यान चंद्रपुरातील प्रभाग 14 मधून भाजपची ज्योती जीवने, काँग्रेसच्या वसंता देशमुख, वैशाली चंदनखेडे आणि सुनील खंडेलवाल जिंकल्या आहेत.
चंद्रपुरात भाजपची सत्ता उलटवून काँग्रेसला विजयी केल्यावर मतमोजणी केंद्राच्या बाहेर काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी नाचून साजरा केला आनंद. काँग्रेस विचाराचे नगरसेवक आणि उबाठा यांची सोबत घेऊन आम्ही चंद्रपुरात सत्ता स्थापन करू, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा केला आहे.
चंद्रपूर मनपाच्या प्रभाग 6 मधून काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते राजेश अडुर यांचा विजय झालाय. काँग्रेस नेते विजय आ. विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असलेले अडुर विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष आहेत. खाण कामगार बहुल वस्ती असलेला हा भाग काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी महत्वाचा होता. आपली जनसेवा आपण अविरत सुरू ठेवू असा विश्वास अडुर यांनी व्यक्त केलाय.
चंद्रपुरात अटीतटीच्या राजकीय लढ्यात चंद्रपूरच्या खासदार।प्रतिभा धानोरकर यांनी आनंद व्यक्त केलाय. हे कार्यकर्त्यांचे, जनतेचे यश आहे. आम्ही भाजपविरोधात केलेल्या लढ्याला यश आल्याचे त्या म्हणाल्या. शहर विकासात आम्ही आपले योगदान देऊ असेही खासदार धानोरकर म्हणाल्या..
2017 साली या महानगरपालिकेत घेण्यात आलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (BJP) पक्षाने 36 जागांसह विजयी बहुमत प्राप्त केले. त्यापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर 12 जागांसह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) पक्षाची कामगिरी राहिली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



