
Jilha Parishad And Panchayat Samiti Elections 2026 : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत पण त्या आधीच भाजपने शिवसेना युबीटीला धक्का दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेयत. शिवसेना युबीटी आणि मनसेच्या उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने खारेपाटण जिल्हा परिषदेत 5 तर कणकवली पंचायत समितीत ६ उमेदवार महायुतीचे बिनविरोध निवडून आले आहेत.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होण्याआधीच निकाल जाहीर झाला आहे. भाजप नेते व पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना धक्का देत भाजप-शिवसेना महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.
यात जिल्हा परिषदेच्या पाच, तर पंचायत समितीच्या सहा उमेदवारांचा समावेश आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीने निवडणुकीच्या सुरुवातीलाच विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.
खारेपाटण मधून प्राची इस्वलकर भाजप, बांदा – प्रमोद कामत भाजप, जानवली – रुहिता तांबे शिवसेना, पडेल – सुयोगी घाडी, भाजप, बापर्डे – अवनी तेली, भाजप हे उमेदवार बिनविरोध आले आहेत. वरवडे- सोनू सावंत, भाजप पडेल अंकुश ठुकरुल भाजपचे, नाडण गणएश राणे भाजप, बापर्डे संजना लाड भाजप, कोकीसरे साधना नकासे भाजप, बिडवाडी संजना राणे भाजप हे सदस्या बिनविरोध निवडून आलेयत. यावरुन भाजप नेते नितेश राणे जिल्ह्यात महाविकास आघाडी संपल्याचं म्हटलयं.
एकापाठोपाठ उबाठाचे उमेदवार अर्ज मागे घेत असल्याने उबाठाच्या गोटात खळबळ माजली आहे. उबाठाचे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमच्या उमेदवारांना पैशाचे आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त केले जात असल्याचा गंभीर आरोप केलाय. तर उबाठाकडे सक्षम उमेदवार नसल्याने विकाम कामं कोण करणार हे माहित असल्यानेच उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचं निलेश राणेंनी म्हटलंय. उबाठाचे उमेदवार एका मागोमाग उमेदवारी अर्ज मागे घेत असताना उबाठाचे वरिष्ठ नेते मात्र सुशेगात पहायला मिळत आहेत. आता जे काही उमेदवार उरलेयत ते तरी आपली उमेदवारी कायम ठेवतात की महायुतीकडून शिवसेना युबीटीला आणखी धक्के दिले जातात हे बघावं लागेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



