digital products downloads

कन्नड पालिकेच्या एक्स्प्रेस फीडरवर विद्युत कंपनीचा कब्जा‎: नगरसेवक कोल्हे यांचा आरोप, देयक जास्त येत असल्याचा आक्षेप‎ – Chhatrapati Sambhajinagar News

कन्नड पालिकेच्या एक्स्प्रेस फीडरवर विद्युत कंपनीचा कब्जा‎:  नगरसेवक कोल्हे यांचा आरोप, देयक जास्त येत असल्याचा आक्षेप‎ – Chhatrapati Sambhajinagar News



नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा, ‎‎यासाठी पालिकेने उभारलेल्या एक्स्प्रेस ‎‎फीडरवर विद्युत वितरण कंपनीने परस्पर ‎कब्जा केला, असा आरोप स्वीकृत‎ नगरसेवक संतोष कोल्हे यांनी केला आहे.‎ कोल्हे म्हणाले की, शहरातील‎ नागरिकांना सध्या सहा ते आठव्या दिवशी ‎‎पाणी पुरवठा होत आहे. त्यात विखंडित‎ विद्युत पुरवठा हेही प्रमुख कारण आहे.‎ २०११ या वर्षी अखंडित वीजपुरवठा व्हावा ‎‎म्हणून तत्कालीन मुख्याधिकारी नंदकिशोर ‎‎भोंबे यांनी पालिकेच्या वतीने एक्स्प्रेस ‎फीडर उभे केले. त्यासाठी तेरा लाख रुपये‎निधी खर्च झाला. या फीडरमुळे पाणी‎पुरवठ्यासाठी अखंडित वीज उपलब्ध ‎झाली. मात्र सध्या जलशुद्धीकरण‎ प्रकल्पावरील विद्युत पुरवठा पाच ते सहा ‎तास खंडित होत असल्याने पाणीपुरवठा ‎विस्कळीत होत आहे.‎ विद्युत वितरण कंपनीने या एक्स्प्रेस‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎फीडरवर अनधिकृत कब्जा केला आहे.‎याच फीडरहून विद्युत वितरण कंपनीने‎अन्य गाव व ग्राहकांना विद्युत जोडण्या‎दिल्या आहेत. पालिकेला या फीडरचे‎साडेसात लाख रुपये असे मोठे वीज बिल‎येत आहे. हा भुर्दंड पालिकेने का सोसावा?‎या कृत्रिम पाणी टंचाईस विद्युत वितरण‎कंपनी जबाबदार आहे. पालिकेने विद्युत‎वितरण कंपनी विरोधात गुन्हा नोंदवावा,‎अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी‎राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते संतोष निकम,‎नगरसेवक युवराज बनकर, राहुल अशोक‎वाघ, रवींद्र राठोड, बंटी काशिनंद, पाणी‎पुरवठा विभाग प्रमुख बाजीराव थोरात‎आदींची उपस्थिती होती.‎ विद्युत वितरण कंपनीस पत्र‎दिले : मुख्याधिकारी लांडे‎ या संदर्भात मुख्याधिकारी रवींद्र लांडे‎यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी‎सांगितले की, मी नव्यानेच पालिकेत रुजू‎झालो आहे. विद्युत वितरण कंपनीला‎कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.‎विद्युत अभियंते राहुल कर्डे यांना‎चौकशीचे आदेश दिले आहेत. विद्युत‎वितरण कंपनीस पत्र दिले आहे. पालिकेला‎आलेले अतिरिक्त वीज बिल वजावट‎करण्यात येईल. पूर्वी अडीच लाख वीज‎बिल येत होते ते आता सात ते आठ लाख‎येत आहे.‎ चौकशी करून पुढील कारवाई‎ करू : अभियंता वाघचौरे‎ याबाबत विद्युत वितरण कार्यकारी‎अभियंता आर. पी. वाघचौरे यांनी‎सांगितले की, मी वैजापूर दौऱ्यावर‎आहे. कनिष्ठ अभियंता राठोड यांना‎चौकशीचे आदेश दिले आहेत. ही वीज‎जोडणी कधी, कोणी व कोणत्या‎आधारावर दिली याची चौकशी करून‎पुढील कारवाई करू व सध्या या‎ जोडण्या तत्काळ डिस्कनेक्ट करण्यात‎येतील, असा इशारा त्यांनी दिला.‎

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp