digital products downloads

भाजपाच्या ‘त्या’ 10 जणांमुळे शिंदेंच्या सेनेचा मुंबईत झाली गोची! ही घ्या नेमकी आकडेवारी

भाजपाच्या ‘त्या’ 10 जणांमुळे शिंदेंच्या सेनेचा मुंबईत झाली गोची! ही घ्या नेमकी आकडेवारी

BMC Election Shivsena Loss 10 Places Due To BJP: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीमुळे शिंदेंच्या शिवसेनेला कसा फटका बसला याची सविस्तर माहिती आणि आकडेवारी समोर आली आहे. भाजपामधील बंडखोरांमुळे सहकारी पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दहा उमेदवारांना पराभव पत्करावा लागल्याचे आता आकडेमोड समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. महायुतीत लढत असतानाही मुंबईतील जवळपास 30 प्रभागांमध्ये भाजपचे बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यापैकी 10 प्रभागांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना बंडखोरांना झालेल्या मतदानाचा फटका बसून पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

शिवसेनेच्या उमेदवारांचा जेवढ्या मतांनी पराभव झाला आहे त्यापेक्षा जास्त मतं भाजपच्या बंडखोरांना मिळाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्या प्रभागांमध्ये युती धर्माचे पालन आले असते तर शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची संख्या 40 च्या आसपास पोहोचली असती, असे शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिका-यांचे म्हणणे आहे. भाजपला शिवसेनेमुळे 11 जागांवर फटका बसल्याचा एकीकडे आरोप होत असतानाच आता शिवसेनेलाही भाजपच्या बंडखोरीचा त्रास झाल्याचा प्रत्यारोप केला आहे. मुंबई महापालिकेमध्ये 90 जागा लढणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 29 जागांवर विजय मिळवता आला.

नाराजी उघड पण…

खरं तर महायुतीत लढत असताना काही इच्छुक नाराज होणार हे उघड असते. त्यांना वेळीच समज देणे अपेक्षित होते, भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून फटका शिवसेना उमेदवारांना बसला, अशी नाराजी शिवसैनिकांकडून व्यक्त होत आहे. नेमका कोणत्या प्रभागात कसा फटका बसला हे जाणून घेऊयात…

अणुशक्ती नगर- प्रभाग क्रमांक 143 मध्ये शिवसेनेच्या शोभा जयभाये यांना 943 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. तिथे भाजपच्या महिला तालूका अध्यक्ष स्वाती उम्रटकर यांनी बंडखोरी केली होती.

अंधेरी ईस्ट – वॉर्ड क्रमांक 121 मध्ये शिवसेनेच्या प्रतिमा खोपडे यांचा अवघ्या 14 मतांनी पराभव झाला आहे. या प्रभागात भाजपच्या मंडल अध्यक्ष जयश्री वळवी यांनी बंडखोरी केली होती. वळवी यांनी 175 मतं घेतली आहेत.

वर्सोवा- प्रभाग क्रमांक 61 मध्ये शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा 2005 मतांनी धक्कादायक पराभव झाला. या ठिकाणी भाजपच्या मंडळ अध्यक्ष उर्मिला गुप्ता यांनी बंडखोरी करून 2737 मतं घेतली आहेत.

दिंडोशी – वॉर्ड क्रमांक 41 मधून मानसी पाटील या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा अवघ्या 596 मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपचे मंडल सचिव दिव्येश यादव यांनी बंडखोरी केली होती. त्यांना 1260 मतं मिळाली आहेत.

वांद्रे पूर्व – पल्लवी सरमळकर यांचा प्रभाग क्रमांक 94 मधून 2360 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष रेश्मा मालुसरे यांनी बंडखोरी करून तब्बल  बंडखोरी करत तब्बल ६८३२ मते घेतली.. ही बंडखोरी झाली नसती तर पल्लवी सरमळकर यांचा सहज विजय झाला असता.

कुर्ला – प्रभाग क्रमांक 169 मध्ये शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा जय याचा 970 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपचे बंडखोर उमेदवार (जिल्हा कमिटी मेंबर) अमित शेलार यांनी तब्बल 3225 मतं घेतली आहेत.

सायन कोळीवाडा – प्रभाग क्रमांक 173 मधून पूजा कांबळे या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. त्यांचा 4974 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या बंडखोर उमेदवार शिल्पा केळुसकर यांना मिळालेली  मतं 9310 आहेत . केळूसकर या भाजपच्या मंडळ अध्यक्ष आहेत.

दिंडोशी – प्रभाग क्रमांक 39 मध्ये विनया सावंत यांचा 2352 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपच्या मंडळ अध्यक्षाची पत्नी सुमन सिंग यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती. तिथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला अपेक्षित सहकार्य केले नसल्याचा आरोप होतोय.

मागाठाणे – प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेच्या सुवर्णा गवस यांचा 2884 मतांनी पराभव झाला. तिथे भाजपचे बंडखोर प्रिती दांडेकर उभ्या राहिल्या होत्या.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp