
Ajit Pawar Bombardier Learjet 45 Plane Crash : जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवार 28 जानेवारी 2026 रोजी मुंबईहून अजित पवार बारामतीच्या दिशेनं रवाना झाले. मात्र बारामतीपासून साधारण 2 किमी अंतरावर असतानाच ते ज्या विमानानं प्रवास करत होते, त्याचा अपघात झाला आणि हवेत घिरट्या घालणारं त्यांचं विमान 500 फूट उंचीवरून दरीसदृश्य भागात असणाऱ्या शेतात कोसळलं आणि काही सेकंदांतच विमानानं पेट घेतला. अतिशय भीषण स्वरुपात झालेल्या या विमान अपघातात अजित पवारांसह विमानातून प्रवास करणाऱ्या इतर पाचजणांचाही मृत्यू ओढावला. दरम्यान ज्या विमानानं अजित पराव प्रवास करत होते त्यासंदर्भातील धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
विमानाला का म्हटलं जातं मृत्यूचं थडगं?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या खासगी विमानानं प्रवास करत होते, ते कोणतं सामान्य विमान नसून हे विमान होतं, Bombardier Learjet 45. हे एक बिझनेस जेट असून, या विमान कंपनीचा इतिहास काहीसा चिंतेत टाकणारा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार जगभरात या कंपनीच्या विमानांचे आतापर्यंत 200 लहानमोठे अपघात नोंदवण्यात आले आहेत.
चार्टर्ड विमानांच्या श्रेणीत ‘लिअरजेट’ हे एक मोठं नाव असून, या कंपनीची सुरुवात 1960 मध्ये विलियम पॉवेल लियर यांनी सुरू केली होती. आजच्या घडीला ही कंपनी कॅनडाती दिग्गज संस्था ‘बॉम्बार्डियर एअरोस्पेस’चा एक भाग आहे. या कंपनीकडून 2021 मध्येच सदरील विमानांची निर्मिती थांबवण्यात आली होती. मात्र जुनी विमानं आजही सेवेत होती आणि आहेत. अशाच एका विमानातून अजित पवार प्रवास करत होते, जो त्यांच्या जीवनातील अखेरचा प्रवास ठरला.
Learjet 45 ची खरी ओळख काय?
Learjet 45 हे विमान त्याच्या वेगासाठी ओळखलं जातं. या विमानाचा ताशी वेग 860 किमी असून, अवघ्या 20 मिनिटांत ते 41 हजार फूट इतक्या उंचीवर पोहोचण्याची किमया करतं. एका खेपेत हे विमान 4 हजार किमीपर्यंतचा मोठा पल्ला गाठू शकतं. आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रचंड ताकदीचं विमान अशी ओळख असणारं हेच वाहन अजित पवारांसाठी मात्र जीवघेणं ठरलं.
अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या विमानतून प्रवास करणाऱ्या कोणाचाही जीव वाचला नसल्याची अधिकृत माहिती यंत्रणांनी जारी केली असून, या माहितीनुसार विमानात खालील व्यक्ती प्रवास करत होते..
-अजित पवार, उपमुख्यमंत्री
-विदीप जाधव, बॉडीगार्ड
-पिंकी माळी
-कॅप्टन सुमित कपूर
-कॅप्टन शांभवी पाठक
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



