
Ajit Pawar Plane Crash Black Box : मुंबईहून बारामतीच्या दिशेनं निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार याच्या विमानाचा भीषण विमान दुर्घटनेत मृत्यू ओढावला असून, राजकीय वर्तुळच नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरलं. राजकारण कोळून प्यायलेल्या मुरब्बी नेत्याचा असा अपघाती मृत्यू ओढावणं, ही बाब अनेकांच्या पचनी पडली नसून अपघात नेमका कसा झाला, विमानात काही बिघाड झाला होता का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या नेतेमंडळी आणि जनसामान्यसुद्धा उपस्थित करत आहेत.
बारामती विमानतळापासून काही अंतरावरच असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात हा तांत्रिक बिघाडामुळं झाला असं प्रथमदर्शनी तपासातून म्हटलं जात आहे. मात्र या अपघाताची संपूर्ण पार्श्वभूमी ब्लॅक बॉक्समधूनच उलगडली जाणार आहे. पण, हा ब्लॅक बॉक्स नेमका आहे काय आणि त्याचं इतकं महत्त्वं का? जाणून घ्या.
‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे नेमकं काय?
कोणत्याही विमानातील एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘ब्लॅक बॉक्स’! लक्षात घ्या नावानुसार याचा रंगही काळा नसतो. हा ब्लॅक बॉक्सचा नारंगी रंगाचा असतो. सुरुवातीच्या काळात ब्लॅक बॉक्स काळ्या रंगाचे असत आणि त्याचमुळं त्याला हे नाव पडलं. पुढं या ब्लॅक बॉक्सचा रंग बदलला मात्र त्याचं नाव तसंच राहिलं.
विमानातील या ब्लॅक बॉक्सचे दोन मुख्य भाग असतात. यामध्ये फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) चा समावेश असतो. विमानाच्या अपघाताच्या तपासादरम्यान हे दोन्ही भाग अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि म्हणूनच अजित पवार यांच्या विमान अपघातात हा ब्लॅक बॉक्स नेमका कसा उलगडा करतो याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. कारण हीच दोन्ही यंत्रं विमानातील डेटा आणि कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड तेव्हा अपघाताआधी विमानात नेमकं काय घडलं याची माहिती समोर येणार आहे.
ब्लॅक बॉक्समधील महत्त्वाच्या गोष्टी…
फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR): हे एक असं यंत्र आहे, ज्यामध्ये विमानातील विविध पॅरामीटर्स मोजले जातात. उदाहरणार्थ विमान किती उंचीवर, किती वेगाने आणि कोणत्या दिशेने उडत आहे वगैरे तपशील.
कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR): या यंत्राच्या मदतीनं कॉकपिटमध्ये होणारा संवाद, सर्व आवाज आणि इतर गोष्टी रेकॉर्ड होतात.
ब्लॅक बॉक्सची विमानात नेमका कुठे असतो?
ब्लॅक बॉक्स सहसा विमानाच्या मागील भागात असतो. अपघाताच्या वेळी कमीत कमी नुकसान व्हावं या हेतूने हा ब्लॅक बॉक्स मागील भागात ठेवला जातो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सच्या बॅटरीची क्षमता खूप जास्त असते, ज्यामुळे त्यात बराच काळ डेटा रेकॉर्ड होतो. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवसांपर्यंत टिकते. ब्लॅक बॉक्स हे विमानातील एक आवश्यक उपकरण असून अजित पवार विमान अपघातप्रकरणी आता हा ब्लॅक बॉक्स नेमकी कोणती माहिती समोर आणतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



