
आतापर्यंत अनेक विमानाचे अपघात झाले यामध्ये काय चौकशी झाली समोर आले का? गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन झाले, चौकशीसाठी एक टीम तयार करण्यात आली त्याचे काय झाले असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत म्हणाले की, अनेक अपघात झाले त्यातील काही तथ्य जनतेसमोर आले पाहिजे. अजित पवार यांच्यासारखा लोकप्रिय नेता काल विमान अपघातात आपल्यातून निघून जातो, त्यामध्ये नेमके काय बिघाड झाला हे महाराष्ट्रातील जनतेला समजले पाहिजे. रडार, विमानतळ नेमके कशात गडबड झाली. केवळ श्रद्धांजली वाहून काही होणार नाही. नेमका अपघात का झाला हे समजले पाहिजे. सखोल तपास करणे गरजेचे संजय राऊत म्हणाले की, बारामतीच्या छोट्या विमानतळावर यापूर्वी अनेक विमाने उतरली आहेत, आणि अजित पवारही येथे अनेकदा आले होते. मात्र, कालच्या दुर्दैवी अपघातात विमानाने दोनदा उतरायचा प्रयत्न केला, परंतु विजिबिलिटी कमी असल्यामुळे विमान भरकटल्याचे दिसून आले. प्राथमिक माहितीवरून अपघाताचे कारण तांत्रिक असावे, असा अंदाज आहे, आणि डीजीसीएने या घटनेचे सखोल तपास करणे अपेक्षित आहे. अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना गती मिळाली आहे. काहीजण अपघात की घातपात यावर चर्चा करीत असताना, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नेत्यांना भविष्यात विमान प्रवास करताना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे अशा घटनांचा धोका अधिक संजय राऊत म्हणाले की, पायलट आणि कोपायलट अनुभवी होते. अपघात तांत्रिक कारणामुळे झाला आहे. डीजीसीएने सर्व तथ्ये समोर आणली पाहिजेत. भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत. राजकारणी घाईत असल्यामुळे विमान प्रवास करतात, परंतु विमानाची स्थिती, पायलटचा अनुभव आणि इतर तांत्रिक बाबी देखील योग्य असाव्यात. पूर्वी लोक ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करायचे, आता राजकारणी ताबडतोब विमानाने निघतात. त्यामुळे अशा घटनांचा धोका अधिक वाढतो. नेमके तथ्य बाहेर आले नाही संजय राऊत म्हणाले की, तांत्रिक चुका विमान बिघाड विमानतळ यासंदर्भातील चौकशी ही डीजीसीएच्या माध्यमातून होत असते. नेमके मागील प्रकरणी कोणती चौकशी करण्यात आली? तर विकिपीडिया फास्ट यंत्रणा आहे मात्र त्या घटनेवर बोलण्याची ही वेळ नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. गेल्या 10 वर्षांत अनेक अपघात झाले पण त्यांचा अहवाल काही आला नाही, डीजीसीए टीम बनवते आणि चौकशी करतो असे सांगते पण चौकशीचा अहवाल काय हे काही समजत नाही. तथ्य काही त्यांनी बाहेर येऊ दिले नाही असा आरोप राऊतांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



